Ajit Pawar | सचिन वाझेच्या पत्रात पवारांचा उल्लेख, अजित पवारांची चौकशी करावी; हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) लिहिलेल्या पत्रातील आरोपांवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अ‍ॅड. रत्नाकर डावरे यांनी याचिका दाखल करुन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

सचिन वाझे सध्या पोलीस कोठडीत असून अँटिलिया स्फोटके प्रकरणात आणि मनसुनख हिरन हत्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात गुटखा व्यापारी दर्शन घोडावत (Darshan Ghodavat) यांच्याकडून 100 कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे. घोडावत हे पवार यांचे निकटवर्तीय आहेत, असा उल्लेख या पत्रात आहे. त्यामुळे पवार यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी अशी मागणी याचिकेत केली आहे.

रिमांड दरम्यान सचिन वाझे याने सुनावणीमध्ये हे पत्र विशेष न्यायालयात दिले होते.
परंतु विशेष न्यायाधिशांनी पत्र दाखल करुन घेतले नाही.
नियमित कायदेशीर प्रक्रियेनुसार बाजू मांडण्याची सूचना न्यायालयाने त्यावेळी दिली होती.
या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरही आरोप करण्यात आले होते.
त्यामुळे पवार आणि परब यांच्या चौकशीची मागणी याचिकाकर्ते अ‍ॅड. रत्नाकर डावरे यांनी केली आहे.
लवकरच यावर नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Web Titel :- ajit pawar | a petition against deputy chief minister ajit pawar in mumbai high court

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट