रोहित यांच्या ‘उमेदवारी’ची चर्चा असलेल्या ‘कर्जत-जामखेड’मधील शिवस्वराज्य यात्रेला अजित पवार ‘गैरहजर’, ‘उलट-सुलट’ चर्चा

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या राजकारणामध्ये काका-पुतण्याची जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. काका-पुतण्यामधील संबंध आणि त्यांच्यातील वाद याला राजकीय किनार नेहमीच राहिलेली आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक काका-पुतण्याची जोडी आहे, ती म्हणजे रोहीत पवार आणि अजित पवार यांची. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे. या यात्रेदरम्यान खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे राज्याच्या दौऱ्यावर असून मतदारांच्या भेटी घेत सरकारवर टीका करत आहेत.

ही यात्रा कर्जत-जमखेड मतदारसंघामध्ये आली. या मतदार संघातून इच्छूक असलेले रोहीत पवार यांनी मतदारसंघामध्ये जय्यत तयारी केली आहे. पण जेव्हा ही यात्रा मतदारसंघात आली त्यावेळी इतके दिवस यात्रेत दिसणारे रोहीत पवार यांचे काका आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मात्र यात्रेत दिसले नाही. त्यामुळे मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून मंजुषा गुंड या इच्छूक आहेत. मंजुषा गुंड या अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले राजेश गुंड यांच्या पत्नी असून या ठिकाणी रोहीत पवार देखील इच्छूक आहेत. पवार घराण्यातील उमेदवार असल्याने मंजूषा गुंड यांना डावलून रोहीत पवार यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. त्यातच शिवस्वराज्य यात्रेला अजित पवार हे गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे. अजित पावार यांनी दांडी मारल्याने त्यांचे विश्वासू धनंजय मुंडे यांनी देखील दांडी मारल्याने या दोघांकडून रोहीत पवार यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हापासून कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहीत पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. लोकसभा निवडणुकीदरम्यान फेसबुकवर लिहलेल्या पोस्टवरून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली होती. त्यातच शिवस्वराज्य यात्रेला अजित पवार यांनी दांडी मारल्याने ते रोहीत पवार यांच्या उमेदवारीबाबत उत्सुक दिसत नाहीत का ? रोहीत पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबर राज्यातील दौऱ्यावर दिसून येतात. मात्र, रोहीत पवार काका अजित पवार यांच्यासोबत का दिसत नाहीत ? अशी कुजबुज सुरू झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like