Ajit Pawar | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ईडीच्या रडारवर?

सातारा न्यूज (Satara News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी (financial malpractice case) एक मोठी कारवाई (action) केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकाचा जरंडेश्वर साखर कारखाना जप्त (ED seizes jarandeshwar sugar factory belonging to Deputy Chief Minister Ajit Pawar’s relative in financial malpractice case) केला आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी (Jarandeshwar Sugar Factory Case) ईडीनं (ED) दिलेल्या माहितीनुसार, कारखाना विकत घेणारी कंपनी गुरु कमोडिडीज (Guru Commodities) मध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या जय अ‍ॅग्रोटेक (Jay Agrotech) या कंपनीतून सुमारे 20 कोटी रुपयांचे भांडवल आलेलं होतं. तर अजित पवार (Ajit Pawar) यांचे मामेभाऊ राजेंद्र घाडगे (Rajendra Ghadge) जरंडेश्वर विकत घेणाऱ्या कंपनीचे संचालक (director) आहेत. यामुळे एकाच वेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सहकारी बँकेचे संचालक (Director of State Co-operative Bank) असताना कारखाना कमी किंमतीत मिळवला, तो आपल्याच नातेवाईकांच्या नावे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. कारण यामधील गुंतवणूक ही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Ajit Pawar’s wife Sunetra Pawar) यांच्या नावाने असलेल्या जय अ‍ॅग्रोटेक (Jay Agrotech) कंपनीतून करण्यात आली होती.

 

कारखाना भाडेतत्त्वावर दिला होता

गुरु कमोडिटीजनं (Guru Commodities) हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल्स प्राव्हेट लिमिटेडला (Jarandeshwar Sugar Mills Pvt. Ltd.) भाडेतत्त्वावर दिला. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडे (Sparkling Soil Pvt Ltd.) या कारखान्याचे सर्वात जास्त शेअर्स आहेत. दरम्यान, ईडीने (ED) 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त (Property confiscated) केली आहे. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय राजेंद्र घाडगे (Rajendra Ghadge) यांच्या ताब्यात होता.

 

2010 मध्ये कारखान्याचा लिलाव

साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory in Satara) थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं (Maharashtra State Co-operative Bank) 2010 मध्ये या कारख्यान्याचा लिलाव (Factory auction) केला.
हा कारखाना गुरु कमोडिटीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला (Guru Commodities Services Pvt) विकला.
हा व्यवहार बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात झाला.
तसेच त्यासाठी घेतलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप ईडीकडून (Ed) करण्यात आला आहे.

 

गैरव्यहार झाल्याचा आरोप

माजी आमदार आणि माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील (Former MLA and former Revenue Minister Shalinitai Patil) यांनी या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.
थकीत कर्जामुळे कारखान्याचा लिलाव झाला असला तरी या प्रकरणी गैरव्यवहार झाला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी केला होता.
शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या.

Web Titel :- Ajit Pawar | After action on former home minister anil deshmukh Enforcement Directorate attaches Ajit Pawar’s relatives run sugar mill worth 65 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू