Ajit Pawar | अरे निधी काय कुणाच्या बापाच्या घरचा आहे का? अजित पवारांचा प्रतिप्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंड होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप शिंदे आघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून शिंदे भाजप गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळावर टीका केली आहे. महाविकास आघाडीने आपल्या कार्यकाळातील तीन वर्षे कोणताही निर्णय न देता फक्त स्थगिती देण्यातच तीन वर्षे वाया घालवली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना उत्तर दिले आहे. आम्ही मागच्यावेळी सरकारमध्ये असताना मी अर्थसंकल्पात जे जाहीर केले होते, त्याला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे काही गावांच्या कामांना निधी थांबला. अरे कुणाच्या बापाच्या घरचा निधी आहे का? असा प्रतिप्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

अजित पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरदेखील संतप्त प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, ते कर्नाटकवाले आम्हाला सारखे शिव्या घालत आहेत. आपल्या गाड्या फोडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मी बैठक घेतो, तर बोम्मई म्हणाले की, मी बैठकीला येणार नाही. तसेच एक इंचही जागा आम्ही महाराष्ट्राला सोडणार नाही. अरे चर्चेतून मार्ग निघतो ना. तुम्ही चर्चा तरी करायला या.

Web Title :-Ajit Pawar | ajit pawar answer devendra fadnavis over fund stay in shinde fadnavis government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Ramdas Athawale | सुषमा अंधारे आधी आमच्या पक्षात होत्या; टीका करण्यासाठी शिवसेनेने त्यांना पक्षात घेतले – रामदास आठवले