Ajit Pawar | ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार, दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?, अजित पवारांचा संतप्त सवाल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम (Thane Former Corporator Madan Kadam) याने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा येथे गोळीबार (Firing) केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू (Death) झाला, तर एक जण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. ते विधानसभेत बोलत होते. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेवरुन (Law and Order) सरकारला चांगलेच धारेवर धरले.

काय म्हणाले अजित पवार?

ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनचा 15 मार्च रोजी मोरणा परिसरात अपघात झाला होता. अपघातावेळी त्यांची स्थानिकांशी बाचाबाची झाली. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी स्थानिक ग्रामस्थ व कदम यांच्यात वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने मोरणा भागात बेछुट गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिक व्यकींचा मृत्यू झाला.

तसेच येथील एका सोसायटीची निवडणूक (Society Election) व पवनचक्की चे (Windmill) प्रलंबित पेमेंट
हा विषयसुद्धा या गोळीबाराच्या मागे आहे. या घटनेत मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभूराज देसाई
(Shambhuraj Desai) यांचा कार्यकर्ता आहे.
या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
या प्रकरणात मदन कदम व त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था
राखण्याच्यादृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात केली.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar asked the government to take the lives of both of them by firing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

MLA Siddharth Shirole | वारजे परिसरात बिबट्याचा वावर वाढला, सरकारने उपाययोजना करावी; आमदार सिद्धार्थ शिरोळे

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाने लेकी बाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली “तिला कालांतराने थेरपीची गरज भासू शकते….”