Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha Nagpur) आज नागपूरमध्ये होत आहे. ही दुसरी सभा असून या सभेत अजित पवार (Ajit Pawar) बोलणार का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य करताना आपण आजच्या सभेत भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

 

मविआच्या वज्रमूठ सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) नागपूरात आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज होणाऱ्या सभेत आपण भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भाषण न करण्या मागचे कारण देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

 

आज नागपूर येथे सभा होणार आहे. यानंतर नाशिक आणि कोल्हापूर येथे वज्रमूठ सभा पार पडणार आहे. माझ्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मी भाषण करणार की नाही असे प्रश्न उपस्थित होतायत. तर प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषण करायचं असं ठरलं आहे. कोणी दोघांनी भाषण करायचं ते पक्षान ठरवायचं आहे.

 

मागच्या सभेत काँग्रेसकडून (Congress) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan),
शिवसेनेकडून (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)
आणि राष्ट्रवादीकडून (NCP) मी आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाषण केलं होतं.

 

तर आज होणाऱ्या सभेत आमच्याकडून जयंत पाटील (Jayant Patil) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) भाषण करणार आहेत.
देशमुख हे विदर्भातील नेते आहेत. पाटील हे पक्षाचे प्रांतध्यक्ष आहेत.
काँग्रेसकडून नाना पटोले आणि सुनील केदार (Sunil Kedar) हे बहुतेक भाषण करतील.
मर्यादित वेळेत भाषण जनतेला ऐकायला मिळावे हा या मागचा हेतू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar big statement not speech in mahavikas aghadi vajramuth sabha nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

Unseasonal Rains In Pune | अलर्ट ! आगामी 2 दिवस पावसाचे, पुणेकरांनी घ्यावी काळजी