Ajit Pawar | लवासा प्रकरणी अजित पवारांचे सरकारला आव्हान, म्हणाले- ‘तर सर्व यंत्रणा कामाला लावून आमची…’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लवासा हिल स्टेशन प्रकरणी (Lavasa Hill Station Case) राज्य सरकारला आव्हान केले आहे. राज्यातील सर्व यंत्रणा कामाला लावून आमची चौकशी करा, असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला दिला आहे. आम्हाला चौकशी झाल्यास काही अडचण नाही. केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणा कामाला लावून तुम्ही या प्रकरणाची चौकशी (Inquiry) करा, असे अजित पवार म्हणाले.

राज्यात लागू झालेल्या लोकायुक्त कायद्याचे (Lokayukta Act) आम्ही स्वागत करत आहोत. त्यातील योग्य अयोग्य काही बाबी आहेत का? ते पाहून चर्चा करु, जर काही चुकीचं असेल तर नक्कीच आम्ही त्याला विरोध करु असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

यावेळी पवारांनी (Ajit Pawar) सीमाप्रश्नावर देखील भाष्य केले. बेळगाव सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) न्यायप्रविष्ट असताना लोकांना भडकावण्याचे काम कोणी केले, हे सर्वांना माहीत आहे. त्याचसाठी हे अधिवेशन तीन आठवडे करावे, अशी आमची मागणी आहे. विदर्भाचे प्रश्न, महागाई, बेकारी असताना कर्नाटक सीमा वादाचा (Maharashtra-Karnataka Border Issue) प्रश्न जाणूनबुजून पुढे केला जात आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

राज्यपालांवर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) पाडण्यासाठी भाजपनेच (BJP) प्रयत्न केले हे आता सिद्ध झाले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोणता व्हिडिओ ट्विट केला हे माहीत नाही, परंतु आम्ही जो मोर्चा काढला त्याचे प्रमुख कारण महापुरुषांचा सातत्याने होणारा अपमान हे आहे. राज्यपालांना (Governor) त्यांच्या वक्तव्यासंदर्भात हटवलेच पाहिजे. याचे कारण, मुद्दाम जाणून बुजून ही भूमिका केली जाते का? असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, होती.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्या बैठकीत कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्यास आणि महाराष्ट्रातून
कर्नाटकात जाण्यास बंदी घातली जाऊ नये, असे ठरले आहे.
तरी देखील महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यास पोलीस बंदी घालत आहेत.
प्रत्येक भारतीयाला भारताच्या कोणत्याही भागात जाण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे.
त्यामुळे अशी कुणालाही बंदी घालता येत नाही. आपल्या देशात हुकूमशाही नाही.
केंद्राने तात्काळ या मुद्यात लक्ष घालावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar challenge to the government pune lavasa case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; बस चालक जागीच ठार

Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे