Ajit Pawar | रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी, पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्ला!

जामखेड : पोलीसनामा ऑनलाइन – आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध विकासकामांचा (development work) भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिल्यांदाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. या सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, काही लोकांनी निवडणुका (Election) समोर ठेवून काही तरी थातुरमातुर सांगण्याचा प्रयत्न केला. जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होती. पिण्याचे पाणी जास्त दाबाने मिळावे यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी प्रयत्न केला. रोहित पवार यांनी पाठपुरावा केला आणि आता आपण ही योजना मार्गी लावली आहे. मागे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना त्यावेळचे मुख्यमंत्री इथे आले. त्यांनी एक कागद दाखवला आणि सांगितले तत्वत: तुमची योजना मंजूर केली आहे. तत्वत: म्हणजे काय? एकदा योजना मंजुर तरी करायला हवी किंवा मंजुर करणार आहोत असे सांगितले पाहिजे. मी पण अनेक वर्षे काम करत आहे. पण तत्वत: म्हणजे काय? काहीतरी लोकांची दिशाभूल करुन वेळ मारुन न्यायचे काम केले, अशा शब्दात अजित पवार यांनी पहिल्यांदाच फडणवीस यांच्यावर टीका केली.

 

तुम्ही गप गुमान बसा

यावेळी अजित पवार यांनी माजी आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावरही टीका केली. राम शिंदे यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांनी तुम्हाला का नाकारले याचा विचार करा आणि आत्मपरीक्षण करा असा सल्ला अजित पवार यांनी दिला. एवढेच नाही तर रोहित काम करतोय त्याला करु द्या आणि तुम्ही गप गुमान बसा, असेही पवार म्हणाले.

 

विघ्नसंतोषी लोकांमुळे समाजात दंगल

अमरावती (Amravati Violence) येथे आज सकाळ पासूनच तणावाला सुरुवात झाली आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, काही विघ्नसंतोषी लोकांमुळे समाजात दंगल पसरते आणि यात सामान्य माणसाचे नुकसान होते.
त्यामुळे अफवा पसरवू नये असे अजित पवारांनी म्हटले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar criticized devendra fadnavis first time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा