Ajit Pawar | ‘…तर महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवड थेट जनतेतून करा’- अजित पवार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जनतेतून थेट सरपंचाची निवड (Sarpanch Election) केल्याने अनेकवेळा गोंधळ होतो. सरपंच एका विचाराचा आणि सदस्य बॉडी एका विचाराची असते. त्यामुळे ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो, अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. कोल्हापूरमध्ये आज अजित पवार (Ajit Pawar) यांच्याहस्ते नवनियुक्त सरपंचांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

 

तुम्हाला नवीन संधी मिळाली आहे. तुम्ही थेट जनतेमधून निवडून आला आहात. ज्यावेळी थेट जनतेमधून सरपंच निवडण्याचा ठराव झाला त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला होता. जर जनतेमधून सरपंच निवडून देणार असला तर नगराध्यक्ष, महापौर (Mayor), मुख्यमंत्री (Chief Minister) आणि पंतप्रधान (Prime Minister) यांची निवड देखील जनतेमधून करावी. एका ठिकाणी एक पद्धत आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरी पद्धत हे योग्य नाही, अशी आमची भूमिका असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

नवनियुक्त सरपंचांना सल्ला
तुम्ही आता सरपंच म्हणून निवडून आला आहात. काही जण ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
त्यामुळे आता तुम्ही गावचे कारभारी झाला आहात. आता तुम्ही गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे.
जिल्हा परिषद, आमदार (MLA), खासदार निधी (MP Fund) आदीच्या माध्यमातून गावाच्या विकासावर भर दिला पाहिजे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. तसेच सरपंचांना विनंती आहे की, त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. त्यातून गावाचा विकास केला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar criticized grampanchayat sarpanch election process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक