कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर दौऱ्यावर आले असता राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी (Ajit Pawar) भाजपवर देखील सडकून टीका केली. पडळकरांच्या भावाने सांगलीमध्ये काय केले आहे. याची माहिती मी घेणार आहे. पदावर असलो म्हणून नातेवाईकांनी देखील नीट वागायला पाहिजे. हे मात्र सध्याच्या काळात होत नाही. त्याचप्रमाणे लोकप्रतिनीधी झाला म्हणजे शिंगे फुटली असे होत नाही. अशा कठोर शब्दात त्यांनी (Ajit Pawar) गोपीचंद पडळकर यांना सुनावले आहे.
कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. सध्या महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच महापुरूषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात. मुद्दामून ठरवून हे करता का? शिवाजी महाराजांबद्दल वाईट शब्द वापरले तरी दिलगीरी व्यक्त करत नाहीत. माणूस आहे माणूस चुकतो पण हे थांबायला तयार नाहीत. महात्मा फुले श्रीमंत होते त्यावेळी त्यांनी पैसा समाजाला दिला. त्याला तुम्ही भीक म्हणता. त्याचप्रमाणे अजित पवार हा कुणाला घाबरणारा माणूस नाही. असं म्हणत त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवारांबाबत केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले.
तसेच राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, राज्यातील एक जरी उद्योग बाहेर गेला तर प्रचंड नुकसान होतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यांनी दोन-चार उद्योग बाहेर गेले म्हणून काय झाले असे वक्तव्य करू नये, असं म्हणत अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यावर टीका केली.
दरम्यान, राज्यातील सद्य स्थितीबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘सध्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वातावरण आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे.
स्थानिक स्वराज संस्थेच्या फेब्रुवारी 2022 ला निवडणुका घ्यायच्या होत्या. दुर्दैवाने ओबीसींची संधी काढून घेतली.
याविरोधात न्यायालयात सुद्धा गेलो. मात्र तोपर्यंत सत्तांतर घडले. आज सहा महिने झालेत पहिले काही महिने दोघेच काम करत राहिले.
43 लोक मंत्रिमंडळात घेता येतात. त्याने लोकांची कामे गतीने होतात. आम्ही म्हटल्यावर मंत्रिमंडळ वाढवले.
एकाही महिलेला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व नाही. चांगल्या महिला विधिमंडळात आहेत.
आम्ही महिलांना संधी दिली होती तुम्ही संधीच देत नाही तर महिला काम कशा करणार.
महिलांना मंत्रिमंडळात स्थान देत नाहीत महिलांनी कोणाची बटणे दाबायचे हे ठरवले पाहिजे.’
अशा शब्दात अजित पवारांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी बोलताना, सुप्रिम कोर्टात सुरू असलेली केस ही जेष्ठ वकील हरिष साळवी
यांच्याकडे देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी बोलताना अजित पवार(Ajit Pawar ) यांनी केली.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar criticizes gopichand padalkar and brother bramhanand padalkar over sangli vandalism case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…