Ajit Pawar | अजित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल दि.९ रोजी एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे म्हटले होते. आपल्यावर बलात्काराचे आरोप केले जाणार असल्याचे षडयंत्र रचण्यात येत असल्याचे देखील यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यावर आज राज्याचे विरोधापक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार(Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. (Ajit Pawar)

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘एखाद्या व्यक्तीने जर कोणावर बलात्कार केला नाही आणि तरीही त्याच्यावर बलात्काराची केस दाखल करायची म्हणजे ही मोगलाईच लागली. असं दुनियेत कधी घडत नाही. हे जर व्हायला लागलं तर यातून महाराष्ट्रात उठाव होईल. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच यावर महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळतं की कशा पद्धतीने गोवण्यात येतय, काय करण्यात येतय? इतक्या खालच्या पातळीवर राज्याचं राजकारण जर जाणार असेल आणि सरकारी यंत्रणा या गोष्टीचा वापर करण्यात येणार असेल, तर आम्हालापण वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल, आम्हीपण त्या आयुधांचा वापर करू. आम्ही पण अशाप्रकारे जर अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही काय मूग गिळून बसलेलो नाही.’ अशा कठोर शब्दात अजित पवार(Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारची कानउघडणी केली.

तसेच यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘जनतेबाबत कुठल्याबाबतीत चुकीचं घडलेलं असेल,
तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्षाचा उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला
तरी गोवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो कुणीही सहन करणार नाही. अशाचप्रकारे आमचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले गेले होते, त्यामुळे त्यांनी अतिशय त्रासून त्यांनी राजीनामा देण्याची
भूमिका घेतली होती. परंतु नंतर त्यांना शरद पवारांनी समजावून सांगितलं, मी, जयंत पाटील भेटायला गेलो
व त्यातून मार्ग काढला. वास्तविक जर चुका असतील तर त्यावर कारवाई करायला दुमत असण्याचं कोणाचंच
कारण नाही. पण मुद्दाम कुभाड रचून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर ही महाराष्ट्राची परंपरा नाही.’
असे देखील जितेंद्र आव्हाड प्रकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले.

तसेच केवळ राजकीय विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपविण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते
कदापी सहन केले जाणार नाही. असा इशारा देखील यावेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

Advt.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar criticizes shinde fadnavis government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Government Recruitment | नोकरभरतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये 3765 गुन्हेगारांची झाडाझडती ! 90 सराईत गुन्हेगार गजाआड; 145 कोयते, 3 तलवार, 1 पिस्टल जप्त

Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट कोयता विक्रेत्यावर छापेमारी; गुन्हे शाखेकडून 105 कोयते जप्त