Ajit Pawar | सरकारला शरमेने माल खाली घालावी लागणारी ही घटना, अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील सरकारी महिला हॉस्टेलमध्ये तरुणीवर अत्याचार (Rape) करुन तिची हत्या (Mumbai Hostel Girl Murder Case) केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर मुंबईत महिला सुरक्षीत (Mumbai Crime News) आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकरला धारेवर धरलं. विधान भवन आवारात ते माध्यमांशी बोलत होते.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मुंबई कधीही झोपत नाही, अशा ठिकाणी एका निष्पाप मुलीवर अन्याय केला जातोय, राज्य सरकारची (State Government) मान शरमेने खाली घालणारी ही बाब आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महिला वसतिगृहात (Women’s Hostel) झालेल्या मुलीच्या बलात्कार व हत्येप्रकरणी प्रतिक्रिया नोंदवली. अशा घटना सातत्याने वाढत असताना सरकार त्यावर कठोर भूमिका का घेत नाही? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.
देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पहाटे अशा घटना घडत असतील तर यातून राज्यात कुठेही महिला,
मुली सुरक्षित दिसत नाहीत. या सर्व घटनेला पोलिस प्रशासन (Mumbai Police) आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा
थेट आरोप अजित पवारांनी केला. राज्य सरकार यामध्ये कठोर भूमिका घेताना दिसत नाही.
या घटनेतील नराधमाला सुरक्षारक्षक म्हणून कोणी घेतले याची माहिती समोर येण्यासाठी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली.
महिलांच्या सुरक्षेबाबत (Women’s Safety) राज्य सरकार अशाप्रकारे निष्काळजीपणा दाखवणार असेल तर त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे.
राज्य सरकारने राज्यभरातील महिला वसतिगृहांमधील सुरक्षा यंत्रणा व्यवस्थित आहे का, याचा तपास करावा.
तसेच या गैरकृत्याचा छडा लावावा, अशी मागणी अजित पवारांनी केली.
Web Title : Ajit Pawar | ajit pawar criticizes state government after rape of girl in hostel
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Actress Rasika Sunil | अभिनेत्री रसिका सुनील स्पष्टच बोलली; बोल्डनेस हा पाहणाऱ्या व्यक्तीच्या नजरेवर…!
- Pune Police News | माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर ‘ब्रेन डेड’ झालेले पुणे पोलिस दलातील स्वप्नील गरड यांचं निधन; पुणे पोलिस दलावर शोककळा
- NCP Chief Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार, शरद पवारांचं वक्तव्य