Ajit Pawar | कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्यात कोरोनाची (Coronavirus) रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात काही निर्बंध लावले आहेत. दरम्यान आज (सोमवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे एका कार्यक्रमादरम्यान सातारा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांनी यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही. असं जाहीर केलं आहे.

 

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यक्रमाला गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, असा इशारा दिला आहे. तसेच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, गर्दी कमी व्हावी यासाठी एक तास आधीच जातो आणि उद्घाटन करतो,’ असं देखील त्यांनी नमूद केलं आहे.

 

अजित पवार म्हणाले, ‘आम्ही सकाळी नायगावला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती होती तेथे होतो. आम्ही अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. तिथंही आम्ही सरपंच, आमदार अशी सर्वांशी बैठक घेतली. तिथं मी काही बाबी कबुल केल्या आहेत आणि मी त्या देणार आहे. मात्र, लोक मास्क कमी लावत आहेत. काहीजण मास्क न लावता तेवढ्यापुरता स्वतःचा रुमाल बांधतात आणि पुढे येतात. म्हणजे मास्क त्यांच्याकडे नाहीच आहे. असं होता कामा नये, सर्वांनी मास्क वापरला पाहिजे.

 

‘राज्यात ओमायक्रोन आजाराची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये.
लग्न समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा.
अन्यथा, ओमायक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यावर लॉकडाऊन करण्याची देखील वेळ येऊ शकते.’
असं देखील अजित पवारांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar declared will not attend program of crowd amid corona infection

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा