Ajit Pawar | ‘…अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | जागतिक पर्यटन दिनानिमित्त राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आज (सोमवारी) उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व अन्य मंत्री उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते. मनात काही न ठेवता डायरेक्ट बोलण्याचा स्वभाव असल्याने या कार्यक्रमात अजित पवार यांची नाराजी झाल्याचे बघायला मिळाले. त्या भाषणातच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कार्यक्रमातील निवेदिकेच्या सूचनांमुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सर्वच उपस्थितांना सारखं खुर्चीवरुन उठ-बस करावी लागली.
या कारणामुळे पवार यांनी बोलुन दाखवत नाराजी व्यक्त केली आहे.
त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सुरुवातीपासून मी बारकाईने बघतोय.
निवेदिकेने एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांना बसा-उठा करायला लावलं.
मुख्यमंत्री उठायचे त्यामुळे आम्हाला सुद्धा उठावं लागत होतं आणि बसावं लागत होतं.
एकदाचं सांगितलं असतं तर सर्व संपल असतं. पण तुमच्या हातात माईक असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही.
अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आजचा पर्यटन दिन साजरा करण्यात येतोय. महाराष्ट्रातील अनेक फोटोग्राफर्सनी राज्यातील पर्यटनाचे छान फोटो काढले. ते फोटो बघून महाराष्ट्रात खूप काही आहे, हे समजते. एवढी सुंदर फोटोग्राफी आहे की बोलायला शब्द अपूरे पडतात. जे चांगल आहे त्याचा महाराष्ट्र नेहमीच कौतूक करत असतो. असं देखील अजित पवार यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘निवडणूकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांनाच निवडून द्या’ – अजित पवार

Karad Crime | तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने सपासप वार; हत्येमुळे कराड शहरात प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar |ajit pawar displeasure at the inauguration of the program organized on the occasion of world tourism day cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update