Ajit Pawar | बारामती दौऱ्या दरम्यान अजित पवार भाऊक, हात जोडून म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (रविवार) बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका घटनेत भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सध्या आयकर विभागाकडून छापे (Income Tax Raid) टाकले जात आहेत. आयकर विभागाने अजित पवारांच्या तीन बहिणींच्या घरावर, मुलगा पार्थ पवार (Parth Pawar), जवळच्या नातेवाईकांच्या धाडी टाकल्या आहेत. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज पहिलाच बारामती दौरा होता.

 

बारामती दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिने उद्घाटन झाले. त्यावेळी उपस्थित महिलांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामाचे कौतुक केले. अजितदादा तुमचं काम एक नंबर आहे. तुम्ही खूप छान काम करता. तुम्ही खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा, आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहोत, असे म्हटले. महिलांनी अजित पवारांचं कौतुक करताच अजित पवार भावूक (emotional) झाले त्यांनी हात जोडून तुम्ही निवडून देता म्हणून मी काम करतो असे म्हणत महिलांचे आभार मानले.

 

कोरोनाचे नियम पाळा अन्यथा गेला गेला कोरोना आला आला कोरोना असं होईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
मी फक्त जेवताना आणि पाणी पिताना मास्क काढतो. गेला गेला कोरोना तर आला आला कोरोना अस होईल.
मी अर्थ मंत्री आहे मला आर्थिक विकास कामांचा निधी (Development Fund) कोरोनाला वळवावा लागतो.
यामुळे मास्कचा वापर करा आणि कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar emtional and passionate with womens praise in baramati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amazon सोबत करा कमाई ! केवळ 4 तास काम केल्यास दरमहा मिळतील 60 हजार रुपये, जाणून घ्या कसे?

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 183 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Earn Money | दरमहा 2 लाख रूपयांपर्यंत होईल ‘कमाई’ ! आजपासूनच सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, 90% मदत सरकार करेल