Ajit Pawar | उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी; म्हणाले – ‘मला बोलावताना विचार करा, मी तुमचा…’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या दमदार शैलीत तसेच सडेतोड बोलणारे नेते म्हणून कायमच चर्चेत असतात. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालय (Agricultural College Pune) येथे गोधन 2022 देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी तेथील सर्व स्टॉल आणि गोठ्यांना भेट देऊन पाहणी केली.

कार्यक्रमाला उपस्थित राहताच अजित पवार (Ajit Pawar) तात्काळ एका गोठ्याजवळ गेले. त्या ठिकाणची त्यांनी पाहणी केली. तेथील आतील जमीनीचा स्तर समांतर नव्हता. अनेक ठिकाणचे बांबू तुटलेले होते. ते पाहून अजित पवार म्हणाले, “अरे काय केलंय, तुम्ही मला सांगा एवढं लागत (निधी) आहे, पुरवण्या मागण्यांमध्ये करून देतो. तुम्ही अधिकार्‍यांनी मला बोलवताना दहावेळा विचार करा. मी तुमचा पंचनामा करेन की कौतुक करेन. माझा काटेवाडीचा आणि बारामतीचाही गोठा येऊन पहा. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय काही होत नाही,” अशा शब्दात अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे.

दरम्यान, त्या कार्यक्रमा ठिकाणी गेल्या 40 वर्षांपासून मुरघास प्रकल्प यंत्रावर चारा कापण्याचे काम करणाऱ्या छबूबाई कामठे (Chhabubai Kamathe) आणि 3 महिला या प्रदर्शनाच्या ठिकाणी होत्या. अजित पवार त्यांच्या प्रकल्पाजवळ आल्यावर तेथील महिलांनी फोटो काढण्याचा आग्रह केला. ”कुठल्या तुम्ही, आज एकदम नटून थटून आलात, हातावर मेहंदी पण काढली,” असं अजित पवारांनी म्हणताच तेथील उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Web Title :  Ajit Pawar | ajit pawar express anger during inauguration program in Agricultural College Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त