Ajit Pawar | अजित पवारांची 20 लाखाच्या खंडणी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल (Atul Jaiprakash Goyal) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपींनी अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करत 20 लाखांची खंडणी मागितली. मागील जवळपास 10 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपींच्या त्रासाला कंटाळून संबंधित बांधकाम व्यावसायिकाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक (Arrested) केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी अजित पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

 

”माझ्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार घडल्याचे माझ्या कानावर आले आहे. ज्या अतुल गोयलला खंडणीसाठी फोन गेला होता तो मला ओळखतो. अतुल गोयलला माहीत आहे की, मी ज्यावेळी फोन करतो तेव्हा पलिकडच्या बाजूला प्रायव्हेट नंबर येतो. परंतु आरोपींनी सॉफ्टवेअरचा वापर केल्यामुळे तिकडे माझं नाव गेलं, यामुळे अतुलला संशय आला आणि त्यांनी मला हा प्रकार कळवला. माझ्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्याबरोबर मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना (Pune CP) संपर्क साधला. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) हेही माझ्या सोबत होते.” असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

पुढे अजित पवार म्हणाले, त्यानंतर आम्ही सायबर पोलिसांना (Cyber Police) या विषयीची माहिती दिली.
सायबर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून 6 लोकांना ताब्यात घेतले.
त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.
अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

 

नेमकं प्रकरण काय ?
अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करुन त्याद्वारे त्यांचा पी ए बोलत असल्याचे सांगत एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून वीस लाख रुपयांची खंडणी (Ransom) मागण्याचा व त्यातील दोन लाख रुपये स्विकारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने सापळा रचून 6 जणांना अटक (Arrested) केली आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अतुल जयप्रकाश गोयल (Atul Jaiprakash Goyal) (वय 47, रा. वानवडी) यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

 

Web Title : Ajit Pawar | ajit pawar first reaction on 20 lakh ransom case Atul Jaiprakash Goyal Bundgarden Police Station pune police crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा