Ajit Pawar | अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘या प्रकरणचं सत्य…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) तुरुंगाबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंबिय तुरुंगाबाहेर आले होते. तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), सुप्रिया सुळे (Supriya Sule), छनग भुजबळ (Chhang Bhujbal) आणि दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse-Patil) हे देखील याठिकाणी उपस्थित होते. देशमुख यांची तुरुंगातून सुटका होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आमचे सहकारी अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. आज ते बाहेर आले आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे. हे प्रकरण नेमकं कसं घडलं? याचं सत्य आता लोकांसमोर येईल, असे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

 

आज आम्ही खूप खूश आहोत. आज आम्ही अनिल देशमुखांचं स्वागत केलं. एक बैठक घेतल्यानंतर आम्ही अधिवेशनासाठी जाणार आहोत. न्यायव्यवस्थेबाबत आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. न्यायव्यवस्था जो निर्णय देते तो सर्वांना मान्य करावा लागतो. त्याचं पालन करावं लागतं. पण आमचे एक सहकारी अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. हे सगळं प्रकरण नेमकं कसं घडलं? याचं सत्यही आता जनतेसमोर येईल, असे अजित पवार म्हणाले.

अनिल देशमुख अधिवेशनाला हजर राहणार?
अनिल देशमुख यांची आज जेलमधून सुटका करण्यात आली.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन (Winter session) असून या अधिवेशनाला अनिल देशमुख हजर राहणार का याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) अटींसह जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.
त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशात अनिल देशमुखांना मुंबई बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यामुळं अनिल देशमुख मुंबईबाहेर जाऊ शकणार नसून त्यांना हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहता
येणार नसल्याची माहिती अजित पवार यांनी नागपूर येथे दिली.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar first reaction on anil deshmukh released from jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Subhash Desai | सुभाष देसाईंनी एक हजार कोटींचा घोटाळा केला, खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

Pune Crime | मुलुंड येथील बनावट कॉल सेंटरद्वारे महिलेची फसवणूक करण्याऱ्या आरोपीस जामीन मंजूर

Winter Session 2022 | चर्चेशिवाय, विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर…