Ajit Pawar | हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे, अजित पवार म्हणाले – ‘माझं स्पष्ट मत आहे, आत्ता जे घडत आहे त्याला…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडीने बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ (NCP Hasan Mushrif ED Raid) यांच्या घरांवर छापे टाकले. ईडीने पुणे आणि कागल येथील घरांवर ही कारवाई केली. ईडीच्या कारवाईनंतर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ईडीच्या कारवाईवर आपली भूमिका स्पष्ट केली. माझं स्पष्ट मत आहे की, केंद्रात आणि राज्यात कोणाचंही सरकार असो, राजकीय द्वेषातून कारवाई करु नये, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.
ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांच्या चौकशा
काही आमदार एकनाथ शिंदे (MLA Eknath Shinde) यांच्याबरोबर गेले आहेत, तर काही आमदार मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर (Uddhav Thackeray) राहिले आहेत. ठाकरे गटासोबत असणाऱ्या आमदारांपैकी आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi), नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh), वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) या तिघांवर एसीबीच्या (ACB) चौकशा लावण्यात आल्याचा आरोप अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.
आत्ता जे घडत आहे त्याला…
केंद्र सरकारच्या आयकर विभाग (Income Tax Department), ईडी, एनआयए (NIA), सीबीआय (CBI) यांना घटनेने, कायद्याने देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार दिला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सरकारच्या सीआयडी, एसीबी किंवा पोलीस विभाग या यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. परंतु आत्ता जे घडत आहे त्याला राजकीय रंग आहे अशी शंका काहींच्या मनात उपस्थित होत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
Web Title :-Ajit Pawar | ajit pawar first reaction on ed raids on hasan mushrif in kagal kolhapur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update