Ajit Pawar | …तर दिवाळी गोड होऊ देणार नाही, राजू शेट्टींच्या ‘या’ विधानावरुन अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | शेतकऱ्यांना ऊसाची एक रकमी एफआरपी (FRP) मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आक्रमक झाले आहेत. त्यावेळी आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी मागील दोन दिवसापुर्वी दिला होता. या मुद्द्यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी ते सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मागच्या वर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो. राजू शेट्टी (Raju Shetty) त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचं गणित सांगताना अजित पवार म्हणाले, मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे हे पाहून आपण एफआरपी देतो. एक टक्का साखर वाढली तर 10 किलोला टनामागे 300 रुपयांचा फरक पडतो, असे वाटते. गुजरात मध्ये 3 टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतक-यांना 500 ते 600 रुपये टनाला अधिक भाव मिळतो, साखरेचं पोतं तयार झाले की 1 रुपये व्याज सुरु होते, हे व्याज शेतकऱ्यांच्याच पैशातून दिलं जातं.

पुढे ते म्हणाले, 15 तारखेला कारखाने सुरु होत आहे, 10 कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज 10 लाख रुपये व्याज सुरु होत आहे, याचा भुर्दंड पडतो. आर्थिक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यांच्या पध्दतीने सागंत आहेत. त्या बाबत चर्चा करुन निर्णय घेता येईल, असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी एफआरपीसाठी
येत्या 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती.
त्यावेळी त्यांनी आमचा दसरा कडवट झाला तर राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही,
असा इशारा दिला होता. त्यावेळी राजु शेट्टी यांनी एफआरपीच्या विषयावरुन राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले होते.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar gave answer to raju shetty over warning on sugarcane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | पुण्यातील महिलेचे बँक खाते झाले रिकामे; मेसेजवर संपर्क साधणे पडले महागात

Pune News | योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध ! दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – मोहन जोशी

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांबद्दल आम्हाला तसं काहीच म्हणायचं नाही – शिवसेना