Ajit Pawar | ‘लाड चाललेत नुसते सगळे…’ असे म्हणत अजित पवार भाजपच्या ‘या’ मंत्र्यावर संतापले, सुनावले खडे बोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज शेवटचा दिवस असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झाडल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. विरोधक जास्तच आक्रमक होऊन आपले मुद्दे मांडत आहेत. विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या (Assembly Speaker) विरोधात अविश्वास ठराव सादर केल्यामुळे काही काळ अधिवेशनात गदारोळ माजला. परंतु, अजित पवारांनी (Ajit Pawar) सावध पवित्रा घेत याबाबत आपल्याला काही माहीतच नाही, असे म्हटल्यामुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले. या सर्व घडामोडी विधिमंडळाबाहेर होत असताना विधानसभेत मात्र अजित पवारांचा (Ajit Pawar) पारा चांगलाच चढल्याचा दिसला.

लक्षवेधीनंतर काय घडलं?

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सदस्यांकडून विचारलेल्या लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरू होती. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांना राग अनावर झाला. यामध्ये चार क्रमांकाच्या लक्षवेधीवर पूर्णपणे चर्चा झाल्यानंतर आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी मांडलेल्या पाचव्या लक्षवेधीवर चर्चा होऊन गिरीश महाजनांकडून (Girish Mahajan) उत्तर मिळायला हवं होतं. मात्र, मंत्री गिरीश महाजनांच्या सभागृहातील अनुपस्थितीमुळे तालिका अध्यक्षांनी ही पाचव्या क्रमांकाची लक्षवेधीला बगल देत सहाव्या क्रमांकाची लक्षवेधी पुकारली. यामुळे अजित पवारांचा पारा चांगलाच चढला होता.

मंत्री नाही आले, तर त्यांना जाब कोण विचारणार?

‘पाच क्रमांकाच्या लक्षवेधीला बगल देत पुढे का ढकलण्यात आली, वैभव नाईक उपस्थित असताना किती वेळा ती पुढे ढकलणार? आम्हीही मंत्री पद उपभोगले. आम्ही काय या ठिकाणी एकदम येऊन बसलो नाही. मंत्र्यांचे कामच आहे की त्यांनी इथे यायचं. जर ते मंत्री नाही आले, तर त्यांना जाब कोण विचारणार?’ असा प्रश्नही पवार यांनी केला.

अशा वेळी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना समजून घेऊ शकतो. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण असतो.
आता आम्ही मान्य करतोय. मात्र इथं दुसरीच लोकं उत्तरं देताना दिसतात.
परंतु मंत्री गिरीश महाजन सभागृहात का आले नाहीत.
अगदी बिनधास्तपणे सांगतात पुढच्या अधिवेशनावेळी घेऊयात.
अहो, पुढचं कुणाला माहिती आहे की, अधिवेशनात कोण राहतोय आणि कोण जातोय याची माहिती नाही.
हा कुठाला प्रकार आणि पद्धत झाली? तुमच्यापैकी कोणीही याबाबत काहीच बोलत नाही.
सगळ्यांचे नुसते लाड चाललेत लाड”, अशा पद्धतीने पवारांनी सरकारला खडे बोल सुनावले.

Web Title :– Ajit Pawar | ajit pawar gets angry in maharashtra assembly winter session girish mahajan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

Madhurani Gokhale Prabhulkar | मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजरला अरुंधतीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर

Madhura Deshpande | तब्बल 3 वर्षांनी अभिनेत्री मधुरा देशपांडे दिसणार ‘या’ मालिकेत; साकारणार ‘हि’ महत्त्वाची भूमिका