Ajit Pawar | नगरपरीषदेच्या इमारतीवरील अक्षरांचा रंग गेल्याचे पाहून अजित पवार संतापले; अवघ्या 2 तासात ‘चेंज’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कोणतेही काम लवकर करुन घेण्यात आणि अधिकाऱ्यांना याबाबत लवकर काम करण्याच्या सुचना देण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाव नेहमीच ओळखले जाते. असाच काही प्रकार बारामती (Baramati) येथे घडला आहे. बारामतीच्या नगरपरीषदेच्या इमारतीवर ‘बारामती नगरपरीषद’ (Baramati Municipal Council) या अक्षरांचा रंग गेल्याचे बघून अजित पवार चांगलेच संतापले. तेव्हा पदाधिकाऱ्यांना तातडीने ही अक्षरे बदलण्याची सूचना करत, दोन तासात रंग उडालेली अक्षरे बदला, अजित पवार 2 तासाने पुन्हा येऊन झालेला बदल पाहणार असल्याचंही म्हणाले. पवारांच्या आदेशाने अवघ्या 2 तासात नगरपरीषदे’ची नवीन अक्षरे लावण्याचं काम पुर्णच झालं.

अजित पवार (Ajit Pawar) हे आज (शनिवारी) बारामतीत होते. बारामतीत नगरपरीषदेच्या सोलर प्रकल्पाचे सकाळीच पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे (Mayor Pournima Taware) यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सबाबत कडक धोरणाचा अवंलब करण्याची सूचना त्यांनी दिली. तसेच, नगरपरीषद पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहराच्या सुशोभिकरणात बाधा आणणाऱ्या गोष्टी दिसल्याने अजित पवार चांगलेच संतापले. त्यामुळे तेथील उपस्थितांचे धाबे दणाणले. दरम्यान, अजित पवारांच्या सुचनेनंतर जुनी रंग उडालेली अक्षरे बदलून नवीन रंगीत ‘नाव’ लावेपर्यंत नगरपरीषद अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी तग धरून होते.

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शहराच्या सुशोभिकरणात अडथळा आणणाऱ्या गोष्टी दूर करा.
शहरातील वायरींग भुमिगत करण्यात आले आहे. त्यानंतर देखील काही ठिकाणी वायर लोंबकळताना दिसतात.
पोलीस अधिकाऱ्यांनी यात आवश्यक ठिकाणी लक्ष घालण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.
तसेच, फ्लेक्स पाहिल्याने तेव्हा कडक धोरण अवलंबण्याची सुचना केली.
याबाबत कोणालाही दयामाया दाखवू नका, अगदी अजित पवार असेल तरी गुन्हा दाखल करा.
नगरसेवकाने लावल्यास नगरसेवक पद घालवा.
शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यावर गुन्हे दाखल करा, अजित पवार तुमच्या पाठीशी आहे.
अशा कडक सुचना पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनास दिल्या.

Web Titel :- Ajit Pawar | Ajit Pawar got angry when he saw that the letters on the Municipal Council building had faded; ‘Change’ in just 2 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rains | मुंबईसह राज्यात रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता

Nagpur Crime | धक्कादायक ! ‘या’ कारणामुळं महिलेनं You Tube वरील व्हिडीओ पाहून पोटातलं बाळ ‘पाडलं’, केला गर्भपात; जाणून घ्या प्रकरण

Solapur Accident | सोलापूर-धुळे हायवेवर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली, 2 ठार