Ajit Pawar | ‘पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार?’ अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच आता तिसऱ्या लाटेच्या (Corona virus) शक्यतेची चर्चा आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांंनी स्पष्टीकरण दिलं आहे. पवार हे आज (शुक्रवारी) पुण्यात (Pune) कोरोना आढावा बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लादणार का?, या पार्श्वभुमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टच सांगितलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणालेत, मास्क वापरणं बंद केला तर खूप मोठ्या प्रमाणावर परिस्थिती बदलत आहे. पुण्यात जिथं-जिथं कार्यक्रम, वाढदिवस झाले.
तिथं संपूर्ण घरं कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. पुण्यात नव्यानं निर्बंध लादणार नाही, पण पुणेकरांनी निर्बंध लावण्याची वेळ सरकारवर आणू नये.
मात्र करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असेल तर आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे.

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लादणार का?, या सवालावर त्यांनी उत्तर दिलं आहे की, नवीन निर्बंधाबाबत बैठकीच चर्चा झाली.
परंतु मोठे मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याने, नवीन निर्बंध लादणार नाही.
पण नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याचं दिवशी कठोर भूमिका घेण्यात येईल. त्यामुळे तशा प्रकारची वेळ येवू नये. असे ते म्हणाले.

 

दरम्यान, यावेळी अजित पवार  म्हणाले, शाळा सुरू घेण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
ग्रामीण भागात रुग्ण संख्या जास्त आहे. 5 तालुक्यात रुग्ण जास्त आहेत.
जिल्ह्यात सक्रिय रुग्ण दर 4 % आहे. चाचणी जास्त होत असल्याने रुग्ण ही जास्त आहेत.
असं त्यावेळी अजित पवार म्हणाले.

 

Web Title : Ajit Pawar | ajit pawar in pune corona pune corona review meeting pune lockdown

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘…एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?’, अन् अजित पवार संतापले

India Post recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, भारतीय पोस्ट खात्यात बंपर भरती

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा ! पुढील 3 वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75,000 कोटी रुपयांची करणार गुंतवणूक