Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले; म्हणाले – ‘मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (बुधवारी) झालेल्या कार्यक्रमादरम्यान बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी (BJP and NCP) एकत्र येण्याची चर्चा होती. पण ती आम्ही नाकारली. असं पवार म्हणाले. पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं असा सवाल यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला होता. ‘मी पाठवलं असतं तर सत्ता स्थापन झाली असती,’ असं शरद पवार म्हणाले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना माध्यमांनी हाच सवाल केल्यावर ते चांगलेच संतापले.

 

अजित पवार (Ajit Pawar) आज (गुरूवारी) पुण्यात आले होते. कोरोना रुग्णवाढीच्या मुद्द्यावर त्यांनी माध्यमांशी सवाद साधला. त्यादरम्यान एका पत्रकाराने प्रश्न केला. पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं असं म्हटलं जात आहे, याबाबत विचारलं असता अजित पवार चांगलेच संतापले. ‘हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे,’ असं ते म्हणाले.

दरम्यान, पुढे अजित पवार म्हणाले, ओमायक्रॉनचं (Omicron Variant) संकट दिवसेंदिवस वाढत आहे.
मी तर नेहमीच मास्क वापरण्याबाबत काटेकोरपणे सर्वांत सांगत आलो आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते आहे.
त्यामुळे निर्बंधाबाबत (Restrictions) सरकारला विचार करावा लागेल.
ओमायक्रॉनची तीव्रता सौम्य असली तरी तो कोरोनाच आहे हे जनतेने लक्षात घ्यावं.
त्यामुळे जास्तीत जास्त काळजी बाळगणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांनीही लग्न समारंभांबाबत जरा सामाजिक भान राखून निर्णय घ्यावेत.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar in pune says i will speak whenever i feel it its my right

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलिस ठाण्यातील PSI सह दोघांवर गुन्हा

Wedding Insurance | कोरोनामध्ये लग्न रद्द झाले असेल तर परत मिळतील पैसे, ₹ 7500 मध्ये 10 लाखांपर्यंत विमा कव्हर; जाणून घ्या

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित