Ajit Pawar | ‘कसाही व्यायाम करुन चालत नाही, अति व्यायाम वर घेऊन जातो’, अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आरोग्याची काळजी (Health Care) घेण्याबाबत देखील ते नेहमीच सल्ले देत असतात. मास्क (Mask) वापरण्याबाबत नेहमीच आग्रही असणाऱ्या अजित पवारांनी व्यायाम (Exercise) कसा करावा याचा सल्ला दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, मैदानी खेळांनी (Outdoor Sport) शरीर चांगलं राहतं. गेले दोन वर्षे कोरोनामुळे (Corona) व्यायाम करता आला नाही, कसाही व्यायाम करुन चालत नाही, अति व्यायाम देखील वर घेऊन जातो. त्यामुळे ट्रेनरची मदत घेऊन व्यायाम करा असा सल्ला त्यांनी दिला.

 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर (Corona Patient) बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आता परत कोरोना वाढत आहे. इथं पण बघा बसलेल्या भगिनींनी मास्क घातला आहे. स्टेजवर फक्त एक जणांनी मास्क घातला आहे बाकी कोणीच मास्क घातला नाही, सगळे सांगतात मास्क घाला, मुख्यमंत्री (CM) म्हणतात मी म्हणतोय, परत कोरोना येतोय, अद्याप कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. कोरोना टेस्टिंग कमी झाली आहे. सर्वांनी लस (Vaccine) घ्यावी, बुस्टर डोस (Booster Dose) घ्यावा. राज ठाकरे (Raj Thackeray), सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांचे ऑपरेशन होत त्यावेळी त्यांना कळलं. कोरोना गेलेला नाही त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायला हवी, असे अजित पवार म्हणाले.

 

रस्त्यावर कचरा टाकू नका, अन्यथा…

नागरिकांकडून कचरा (Garbage) रस्त्यावर टाकला जात आहे. यावर भाष्य करताना अजित पवार यांनी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, पुणेकर, मुंढवाकर रस्त्यावर कचरा टाकता. स्वत:च घर साफ अन् बाहेर कचरा. यावर कठोर भूमिका घ्यायला लावू नका. कारण कचऱ्यामुळे घाण होते अन् रोगराई वाढते असं ते म्हणाले.

 

महापालिका निवडणुकीत नवीन चेहरे

अजित पवारांनी सांगितलं की, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत (Municipal Elections) राष्ट्रवादी (NCP) जे उमेदवार देतील ते मान्य असतील.
मी वर वर बोलणारा कार्यकर्ता नाही. जे बोलतो ते मी करतोच. पण मला सांगा आता मी सोडून इकडे कोण आलं.
विरोधी पक्षातील कोण प्रश्न सोडवत आलं का? आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नवीन चेहरे,
महिला काही अनुभवी चेहरे देईल, पण आशीर्वाद देण्याचं निवडून देण्याचे काम तुमच्या हातात आहे.
तो आशीर्वाद तुम्ही द्यावा, असे आवाहन अजित पवार यांनी केलं.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar in pune talk about health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा