Ajit Pawar | सिंचन घोटाळाप्रकरणात अजित पवारांवर कारवाईची टांगती तलवार?, क्लीन चिटचा अहवाल अद्याप हाय कोर्टात प्रलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटवरुन राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे तत्कालीन जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातून (Irrigation Scam Case) एसीबीकडून देण्यात आलेली क्लीन चिटचा अहवाल (Clean Chit Report) अद्याप उच्च न्यायालयाने (Bombay High Court) स्वीकारला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही हा रिपोर्ट प्रलंबित ठेवला असल्याचे वृत एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

 

वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,एसीबीकडून (ACB) देण्यात आलेली क्लीन चिटचा अहवाल अजूनही स्वीकारला नाही आणि फेटाळला देखील नाही.
न्यायालयाने मागील दोन वर्षापासून हा अहवाल प्रलंबित ठेवला आहे.
अजित पवारांना (Ajit Pawar) 2019 साली सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आली होती.
परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी ही क्लीन चिट दिली होती. पण तो अहवाल अद्याप मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही.
दोन वर्षांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा अहवाल स्वीकारला नाही.
त्यामुळे अजित पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली नसून त्यांच्यावर अद्याप कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झालंय.

 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (NCP Leaders Vidya Chavan) यांनी अजित पवारांना अडकवण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

 

Web Title : –  Ajit Pawar | ajit pawar irrigation scam clean chit report is still pending in the mumbai bombay high court

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा