Ajit Pawar | अजित पवार अडचणीत, ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार, कचाकचा बटण दाबा, म्हणजे मला निधी… (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar | जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा प्रचार करताना इंदापूर (Indapur Sabha) येथे केले होते. आता राज्य निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.(Ajit Pawar)

अजित पवार यांच्या या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने चौकशीचे हे आदेश दिले.

दरम्यान, अजित पवार आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणे देताना म्हणाले की, मी इंदापूरमध्ये बोललो. ते ग्रामीण भाषेत बोललो, तेच पुण्यात असतो, तर तिथे कचा-कचा नाही चालत. ज्या भाषेत चालते तसेच बोलावे लागते, चौकशी करण्याचा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. जे ठरेल तसा महायुती धर्म आपण पाळू.

अजित पवार पुढे म्हणाले, इंदापूरमध्ये संयुक्त सभा असतील, त्याला मी उपस्थित राहीन, मागचे खूप साचले आहे. इतर पक्ष वेगळे पण भाजप हा शिस्तीचा पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात आलबेल आहे.

अजित पवार म्हणाले, ज्यांच्याकडून निधी घ्यायचा त्यांच्यावर टीका करता, कसे ते पैसे देतील. भूमिपूजन त्यांनीच केले उद्घाटन देखील त्यांनीच केले, असा नेता असावा लागतो. नाहीतर काही राजकारणी असतात, निवडणूक आली की नारळ फोडतात, परत पुढची निवडणूक आली की नारळ फोडतात. मोदीनी महिलांना आरक्षण दिले. मोदी परत निवडून आले तर संविधान बदलतील असे सांगितले जाते, काहीही थापा मारतात.

अजित पवारांचे कचाकचा वक्तव्य काय आहे…

इंदापूर येथे व्यापाऱ्यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल.
पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका.
विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जसे आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये
देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य