Ajit Pawar | ‘बावनकुळेंच्या त्या वक्तव्यानंतर आमची तर झोपच हरपली’, अजित पवार यांचा मिश्कील टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन | राज्याचे हिवाळी अधिवेशन हे सध्या नागपूर येथे सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. विधानभवनाच्या आतील झालेल्या खडाजंगीचे पडसाद हे विधानभवनाच्या बाहेर देखील बघायला मिळतात. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात रंगलेला कलगीतुरा हा विधीमंडळाबाहेर चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवारांनी भाजपवर टीका करताना ‘करेक्ट कार्यक्रम करतो’ असे वाक्य वापरले होते. त्यावर नागपूरात बोलताना अजित पवारांचा (Ajit Pawar) बावनकुळेंनी चांगलाच समाचार घेतला होता.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागपुरात बोलताना ‘सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू’ असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांना सुनावले होते. ते म्हणाले होते की, ‘कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे खरे तर जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची युती राहूनही कधी राष्ट्रवादीने ७५ च्या वर जागा जिंकल्या नाहीत आणि ते काय कार्यक्रम करणार? बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाही सारखी परिस्थिती आहे. माझी एन्ट्री बारामतीत झाल्यापासून अजित पवारांना भिती वाटत आहे. म्हणूनच त्यांनी काल सभागृहात करेक्ट कार्यक्रम करू असे वक्तव्य केले होते. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. तसेच त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४ मध्ये जनताच ठरवेल.’

अजित पवारांच्या त्या वक्तव्याबद्दल अधिक बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘अजित पवारांच्या तोंडी असे शब्द शोभत नाहीत. अजित पवार (Ajit Pawar) हे आठ- आठ दिवस फोन बंद करून पळून जातात. कधी रडतात.
असे अजित पवार आम्ही बघितलेत. त्यामुळे अजित पवारांनी विदर्भात येऊन आम्हाला आव्हान देऊ नये.
त्यांचं कोणतही, आणि कोणत्याही पातळीवरचे आव्हान आम्ही स्विकारायला तयार आहोत.
त्यामुळे येथून पुढे नागपुरात येऊन अजित पवारांनी अशी भाषा वापरू नये.’

दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘अरे बापरे,
बावनकुळे बोलल्यापासून मला झोपचं येईना हो.. हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांचीच झोप उडाली आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा ताकतीचा नेता अशा पध्दतीने आव्हान देतोय,
मी तर विचार करतोय राजकारणचं सोडून द्यावं. राजकीय सन्यासचं घ्यावा.
२०२४ मध्ये अपमान होण्यापेक्षा सन्यासचं घेतलेला बरा. सांगा त्यांना.’ असे अजित पवार (Ajit Pawar) पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Advt.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar mocks bjp chandrashekhar bawankule assembly winter session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tunisha Sharma Suicide Case | तुनिषा आत्महत्या प्रकणात पोलीस तपासात झाला खुलासा; ‘आत्महत्यापूर्वी तुनिषा आणि शिझान यांच्यात झाले होते संभाषण’

Urmila Nimbalkar | मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या हॉट फोटोजने वेधले सर्वांचेच लक्ष; फोटोज वायरल