Ajit Pawar | ‘जन्माला आलो तेव्हापासून थेंबालाही स्पर्श केला नाही, पण…’; अजित पवारांची सभागृहात जोरदार टोलेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | ठाकरे सरकारने (Thackeray Government) राज्यात सुपर मार्केटमध्ये (Supermarket) आणि वॉक – इन स्टोअर्सला (Walk – In stores) वाईन विक्रीची (Wine Sales) परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं.

 

मद्यावरील कर (Tax On Alcohol) 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतल्यावर सरकारच्या उत्पन्नात 100 कोटींवरून 300 कोटींपर्यंत वाढ झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं. यावेळी बोलताना, ज्या दिवशी जन्माला आलो तेव्हापासून आजपर्यंत थेंबालाही स्पर्श केला नाही हे सगळ्यांनाच माहित आहे. आपल्यावर जबाबदारी आहे म्हणून राज्याच्या हिताचा आणि उत्पन्नाचा विचार करावा लागतो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

गेल्या अनेक वर्षात मी अनुभव घेतलाय. एखादा पेताड असला, तरी तो कुठल्याही गावात असू द्या, आपल्याला त्या गावातली दारूची दुकानं माहिती नसतात.
तरी ते पेंगतच येतंय रात्री. त्याला विचारलं कसं रे ?, तर म्हणतो आलो जाऊन, असं सांगताना अजित पवारांनी बेवड्याची नक्कल करून दाखवली.

दरम्यान, ज्या सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक – इन स्टोअर्समध्ये विक्री करण्यास जर त्या दुकानाच्या मालकाचा विरोध असेल तर या निर्णयाची तिथे अंमलबजावणी होणार नाही, असं अजित पवांरांनी सांगितलं.
जर जनतेलाच नको असेल तर आमची आग्रहाची भूमिका नाही, असंही पवार म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar mocks objection on wine sell liquor in mall supermarket by bjp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा