Ajit Pawar | ‘जनता जमालगोटा देईल’ एकनाथ शिंदेंच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘सुसंकृत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन (New Parliament Building Inauguration) विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना आमंत्रण दिले नसल्याने विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना खोचक शब्दात टोला लगावल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ‘जमालगोटा’ विधानावर अजित पवारांनी (Ajit Pawar) नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी एकनाथ शिंदे यांना यशवंतराव चव्हाणांची (Yashwantrao Chavan) आठवण करुन दिली. एकनाथ शिंदेंनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सुसंकृत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी, बाकीच्या मान्यवरांनी कसं बोलायचं असतं याचे काही संस्कार आपल्यावर केले होते. परंतु हे जमालगोटा वगैरे मुख्यमंत्र्यांना तरी हे शब्द पटतात का? असा सवाल त्यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे सांगातात ना जनता सांगेल वगैरे, मग जनता सांगेलच ना. जनतेने कर्नाटकात सांगितलंच आहे पुढेही जनता सांगेल. आपण लोकशाही मानणारे आहोत. उद्या जनतेला ज्यांना केंद्रात पाठवायचे त्यांना तिथे पाठवतील. राज्यात ज्यांना पाठवायचंय, त्यांना राज्यात पाठवतील. जनता ठरवेल की खरंच महागाई कमी झाली का, बेरोजगारी कमी झाली का? लोकांचे प्रश्न सुटले का? असंही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
नवीन संसद हे अतिशय रेकॉर्ड वेळेत पूर्ण झाले आहे. 2019 मध्ये सुरुवात झाली आणि 2023 मध्ये या वास्तूचे लोकापर्ण होत आहे. ही संपूर्ण देश आणि जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. त्यामुळे संसदेच्या लोकार्पण प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. परंतु काही लोकांकडून विरोध केला जात आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे. विरोधक नेमकं लोकशाहीला विरोध करीत आहेत की मोदींना? विरोधकांना जी पोटदुखी सुटली आहे, त्याचा इलाज आता जनताच जमालगोटा देऊन करेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.
Web Title : Ajit Pawar | ajit pawar ncp targets cm eknath shinde on new parliament building inauguration by pm modi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- AAP Swaraj Yatra Pandharpur To Raigad | ‘आप’च्या पंढरपूर ते रायगड अशी 800 किलोमीटर स्वराज यात्रेची पंढरपुरातून जोरदार सुरुवात
- Pune Guardian Minister Chandrakant Patil | पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार ! सवाई गंधर्वच्या धर्तीवर नृत्यरोहिणी महोत्सवाचे आयोजन; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
- New Parliament Building Inauguration | शरद पवारांची संसद भवन सोहळ्यावर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मी तिकडे गेलो नाही याचं समाधान’