Ajit Pawar | अंबादास दानवेंच्या नियुक्तीवर अजित पवारांचा शिवसेनेला पाठिंबा, नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान परिषदेच्या (Legislative Council) विरोधी पक्षनेतेपदावर (Opposition Leader) शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी नियुक्तीची घोषणा केली. यावर काँग्रेसने (Congress) आणि जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. विऱोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेमध्ये ज्याचे संख्याबळ अधिक असते त्याचा विरोधी पक्षनेता असतो, यावर आता वाद घालत बसण्यात काही अर्थ नाही, असे सांगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा दिला आहे.

 

दरम्यान अंबादास दानवे यांच्या नियुक्तीवरुन काँग्रेस नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली असताना राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीला देखील शिवसेनेने विश्वासात घेतले नाही. चर्चा केली असती तर महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) चांगले झाले असते, असे जयंत पाटील म्हणाले. थोड्याच वेळात विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत हा मुद्दा उचचला जाण्याची शक्यता आहे. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांची (Ajit Pawar) भूमिका महत्त्वाची आहे.

 

अजित पवार म्हणाले, विधान परिषदेमध्ये ज्याचे संख्याबळ त्याचा विरोधी पक्षनेता असतो.
विरोधी पक्षनेता निवडताना अन्य विरोधी पक्षांना सोबत घेतले जाते.
मात्र शिवसेनेने अंबादास दानवेंची परस्पर नियुक्ती करुन टाकली आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे 12 सदस्य आहेत.
राष्ट्रवादीचे 10 आणि काँग्रेसचे 10 सदस्य आहेत. आणखी एक सदस्य अपक्ष आहे.
परंतु ते शिवसेनेच्या बाजुचाच आहे. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या नियुक्तीला आम्ही पाठिंबा देतो.
यावर आता वाद घालत बसण्यात अर्थ नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी दानवेंवरुन निर्माण झालेल्या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

 

Web Title : –  Ajit Pawar | ajit pawar on ambadas danve will mahavikas aghadi break ajit pawars support for shiv sena jayant patals oppose on vidhan parishad lop

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा