Ajit Pawar | अजित पवारांचा टवाळखोर पोरांना इशारा, म्हणाले-‘कोणीही असो, कोणत्याही टुकार पोराला सोडणार नाही’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – फॅमिली आणि मुलींना टवाळ पोरांनी काय केलं तर ते कुणाचंही पोरगं असेल, मी सोडणार नाही. बारामतीत सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे असे म्हणत अजित पवारांनी टवाळखोरांना इशारा दिला आहे. वाढती गुन्हेगारी आणि गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी (Ajit Pawar) हा इशारा दिला आहे. तसेच गार्डनमध्ये मुलं मुली बसले आणि एखादा वेडवाकडं वागला तर त्याची गय करणार नसल्याचेही अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितले.

अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी (दि.18) बारामती दौऱ्यावर आले आहेत. बारामतीमधील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे (Appasaheb Pawar Udyog Bhavan) उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी बारामतीतील कायदा व सुव्यवस्थेला (Law and Order) ठेच लावणारा मग तो कोणीही असो… त्या कोणत्याही टुकार पोराला सोडणार नाही. प्रत्येक आई-बापाने आपल्या मुलाला समजावून सांगावं. बारामतीत कोणालाही असुरक्षित वाटणार नाही याची काळजी मला घ्यावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक सर्व उपाय आखावे लागतील असा सज्जड दम अजित पवारांनी दिला.

अजित पवार पुढे म्हणाले, आजचा वेळ मी कुटुंबासाठी दिला आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. माझा भाऊ 60 वर्षात पदार्पण करतो आहे. त्याचे केस पांढरे आणि माझे केस काळे आहेत. हा रंगाचा परिणाम असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या विचारांना वाट मोकळी करुन दिली.

मी दुधाचा व्यवसाय करुन पुढे आलो

अजित पवार यांनी बस्तान बसवण्यासाठी काय काय केलं, त्यावेळी त्याची काय परिस्थिती होती,
त्यांनी केलेल्या कष्टाचे किस्से त्यांनी यावेळी लोकांसोबत शेअर केले.
ते म्हणाले, मी देखील दुधाचा व्यवसाय करुन पुढे आलो आहे.
माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर याच व्यवसायामुळे माझं बस्तान बसलं होतं.
माझ्या आयुष्यात असे अनेक किस्से आहेत. जे लोकांना खरे वाटणार नाहीत. परंतु एक किस्सा सांगतो.
त्या काळात एक गाय साडे सात हजारांना विकत होतो आणि एक एकर जमीन साडेसात हजाराला घेत होतो.
त्याळात जमीनीचे दर कमी होते आणि बाकी गोष्टींसंदर्भात एक वेगळं कुतूहल पाहायला मिळायचं, असं पवार म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on baramati law and order issues

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | पराभवामुळे त्यांचे डोळे उघडले, 40 टक्के सवलतीच्या निर्णयावरुन रवींद्र धंगेकरांचा सरकारला टोला (व्हिडिओ)

Jayant Patil | ‘…तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व उरणार नाही’, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन जयंत पाटीलांचा शिंदे गटाला धोक्याचा इशारा