Ajit Pawar | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अजित पवारांकडून खबरदारीच्या सूचना; म्हणाले – ‘कोरोना वाढतोय…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्ण (Corona) संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्याला चिंता लागून आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांना कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर पुणे शहरात (Pune News) कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचे पाहून अजित पवार चांगलेच संतापले आहे.

 

पुण्यामध्ये दिवंगत चंचलाताई कोद्रे जिमनशीयमचं उदघाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. “आता परत कोरोना वाढतोय इथं पण बघा बसलेल्या भगिनींनी मास्क घातलं आहे. स्टेजवर फक्त एकाने मास्क घातला आहे, बाकी कोणीच घातला नाही. सगळे सांगतात मास्क घाला, मुख्यमंत्री म्हणतात. मी म्हणतोय, अजून कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. टेस्टिंग कमी आहे, लस घ्या बुस्टर डोस घ्या, राज ठाकरे (Raj Thackeray), सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोना झाला आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यावेळी कोरोना झाला. कोरोना गेलेला नाही काळजी घ्यायला हवी,” असं ते म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “पुणेकर, मुंढवाकर रस्त्यावर कचरा कशाला टाकता, स्वत:च घर साफ अन् बाहेर कचरा यावर कठोर भूमिका घ्यायला लावू नका, कारण कचऱ्यामुळे गहाण होते अन रोगराई होते.” असं ते म्हणाले. ‘कोरोना अजून गेला नाही काळजी घ्या. मैदानी खेळ खेळा, व्यायाम करा. तसेच पाणी जपून वापरा आणि सकाळी लवकर उठा, निर्व्यसनी राहा,’ असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on coronavirus in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा