Ajit Pawar | ‘त्या’ शपथविधीवर अजित पवार यांची स्पष्टोक्ती म्हणाले, ‘मी त्या शपथविधीवर…’

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत पहाटेच राजभवन गाठत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, एका वाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ती शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असू शकते. असे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता, ‘त्यावेळी मी स्वतः म्हटलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही.’ असं म्हणत त्यांनी त्या प्रश्नावर बोलणे टाळले.

२३ नोव्हेंबर २०१९ ला पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, ‘मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट (President Rule) होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली एखादी खेळी असू शकते.’

अजित पवार (Ajit Pawar) यांना त्या शपथविधी बद्दल विचारले असता, ‘पहाटेच्या शपथविधीचा विषय मी काढणार नाही.’ असे स्पष्टपणे सांगितले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pande) यांना टार्गेट देण्यात आले होते. असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला होता. त्यातच देवेंद्र फडणवीस यांना अडकविणाऱ्या मास्टरमाईंडचे नाव जाहीर करणार असल्याचे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले होते.

यावर अजित पवार यांना विचारले असता, अजित पवार म्हणाले की, ‘त्यांनी कोड्यात बोलू नये, स्पष्ट सांगावं.
कोण काय म्हणालं याला उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाहीत. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र आहे,
ज्यांना जे काही सांगायंच आहे त्यांनी सांगावं. असं कोड्यात बोलू नये, स्पष्ट भूमिका मांडली तर लोकांना
जास्त चांगल्याप्रकारे कळेल. मी याआधीच सांगितलं आहे की, अडीच वर्षे उपमुख्यमंत्री असताना ज्या ज्या
चर्चा झाल्या किंवा मी काही निर्णय घेतले त्यात अशाप्रकारची कुठलीही चर्चा आपल्या स्तरावर झाली नाही.’
असे यावेळी बोलताना टीकाकारांना अजित पवार यांनी खडसावले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on oath with devendra fadnavis i will never speak on early morning swearing in says ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Actress Jamuna Passed Away | ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचे वयाच्या 86 व्या वर्षी राहत्या घरी निधन