Ajit Pawar | अजित पवार म्हणाले – ‘साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज (शुक्रवारी) पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून (Jarandeshwar Sugar Factories) होणाऱ्या टीकेवर आज उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. त्यावेळी ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एकूण 30 कारखाने विकले असल्याची यादी अजित पवारांनी सांगितली आहे. राज्य शिखर बँकेने राज्यातील वेगवेगळे 30 सहकारी साखर कारखाने विकले. 6 सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले. 6 सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले. 3 सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. 12 सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आलेत, असे पवार यांनी सांगितले आहे.

Mutual Fund | या दिवाळीत आपल्या मुलांना द्या म्युच्युअल फंडची भेट, 20 वर्षात होईल करोडपती

पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, महाराष्ट्रातील 64 सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेलेत किंवा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिलेत किंवा भाडेकरारावर चालवले जात आहेत, असं ते म्हणाले. जरंडेश्वर साखर कारखान्याबाबबत सतत माझ्या कुटुंबांचा सतत उल्लेख केला जातोय. मला लोकांना सांगायचंय की मुंबई हाय कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा बॅंकेने जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असं हाय कोर्ट आणि सुप्रिम कोर्टानी म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Today | देशात पहिल्यांदा पेट्रोल पोहचले 120 रुपये लीटरवर; List मध्ये जाणून घ्या कोणत्या शहरात आहे सर्वात महाग इंधन

Mutual Fund Investment | ‘या’ 5 म्युच्युअल फंडने 1 वर्षात दिला 118% रिटर्न, तुम्ही सुद्धा केली आहे का गुंतवणूक?

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar | ajit pawar on opposition on jarandeshwar sugar mill said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update