Ajit Pawar | अजित पवार अ‍ॅक्टीव्ह नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा?, दादा म्हणाले – ‘काही गोष्टी दाखवायच्या नसतात…’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation Elections) अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे अद्याप सक्रिय (Active) दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज (Party Workers) असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. यावर स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील पोलीस मुख्यालयात (Shivajinagar Police Headquarters) ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, काही गोष्टी या दाखवायच्या नसतात. नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं हे मला चांगलंच माहीत आहे. 1992 पासून मी राजकारणात (Politics) काम करत असून आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. निवडणुकीसंदर्भात बऱ्याचशा गोष्टी उघड करायच्या नसतात. आमचं काम योग्य पद्धतीने सुरुच आहे. तरीही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना समजावून सांगण्याचे काम आम्ही करु, असे अजित पवार यांनी म्हटले.

अर्थसंकल्पाला माझे प्राधान्य
अजित पवार पुढे म्हणाले, सध्या राज्याचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्याला माझे प्राधान्य आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला अर्थसंकल्पात किती रक्कम द्यायची, त्यांच्या मागण्या काय आहेत ? याबद्दल सरकारची (Government) भूमिका काय असली पाहिजे ? या कामात मी सध्या व्यस्त आहे. पक्षाच्या कामासंदर्भात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच काम ते योग्य रीतीने करत आहेत.

 

महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
तरीही पालिकेने अद्याप महानगरपालिकेतील वॉर्डांची (wards) प्रभागरचना जाहीर केलेली नाही.
अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तसेच अजित पवार हे पुण्यात नेहमीच सक्रिय असतात.
मात्र, यंदा महापालिका निवडणूक असूनही अजित पवार पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमध्ये पुरेसे सक्रिय झालेले नाहीत.
त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये सुरु आहेत.
अजित पवारांनी आज दिलेल्या उत्तरामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम बसेल.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on pcmc and pmc upcoming election in pune Shivajinagar Police Headquarters

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा