Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णसंख्येत घट होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शाळा, महाविद्यालये (School, College) बंद केली होती. दरम्यान आता 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तसेच आपल्या जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने त्यानूसार निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानूसार आज पुण्यातील (Pune News) शाळा-महाविद्यालयांबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

”पुण्यात नवीन रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. काही राज्यांत मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढली आहे. पण महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबईत बऱ्यापैकी रुग्णसंख्या कमी झाली आहे. पुण्यातही दोन दिवस रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती अजून कमी व्हावी अशी अपेक्षा आहे”, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे. त्यावेळी ते पुण्यातील कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते.

 

रुग्णसंख्येत घट होत असताना पुण्यातील शाळा-महाविद्यालयांचं काय होणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”येत्या 1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, 1 ली ते 8 वी पर्यंतचे वर्ग फक्त 4 तास भरतील,” असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार म्हणाले, ”पालकांना विनंती आहे की मुलांना शाळेत पाठवताना आम्ही शाळा-कॉलेज सुरू केले असले, तरी अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
तुम्ही स्वत: त्यांचे आई-वडिल आहात. आम्ही तिथे सगळ्या नियमांचं पालन करून या गोष्टी करणार आहोत.
9 वी पासून पूर्णवेळ शाळा सुरू होतील. मास्क काढूच नये. पुण्यात शाळा आणि महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
राज्यात देखील 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.”

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on schools collages to reopen in pune 1st feb

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा