Ajit Pawar | मंत्रिमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

बारामती/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकार स्थापन करुन महिना पूर्ण होत आला आहे. तरीही मंत्रिमंडळ स्थापनेला (Maharashtra Cabinet Expansion) मुहूर्त मिळालेला नाही. लोकांचे अनेक प्रश्न रखडले आहेत. आता जनतेनेच पहावे राज्यात कशा प्रकारे कारभार सुरु आहे आणि याला कोण जबाबदार आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला. अजित पवार (Ajit Pawar) आज (शुक्रवार) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात त्यांचा जनता दरबार (Janata Durbar) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

 

जनता दरबारात अजित पवार (Ajit Pawar) यांनी नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना पवार यांनी सूचना दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना रखडलेला मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली.

 

अजित पवार म्हणाले, पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे (Flood-Affected Farmer) अतोनात नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. गावातील रस्ते, पुलांची दुरावस्था झाली आहे. तातडीने त्यांना मदतीची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री (CM), उपमुख्यमंत्र्यांनी (Deputy CM) राज्यपालांची (Governor) भेट घेऊन राज्य मंत्रीमंडळ अस्तित्वात आणणे गरजेचे आहे.

 

पावसाळी अधिवेशन (Rainy Season) जुलैमध्येच होते. ऑगस्ट महिना उजाडला तरी पावसाळी अधिवेशन घेण्यात आले नाही.
त्यांना ग्रीन सिग्नल मिळेना, त्यांच्यात एकवाक्यता होईना.
मंत्रिमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, हे काही समजायला तयार नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

 

Web Title :-  Ajit Pawar | ajit pawar on stalled cabinet expansion eknath shinde devandra fadanvis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा