Ajit Pawar | मोदींच्या 9 वर्षाच्या कारकीर्दीला किती मार्क देणार?, अजित पवार म्हणाले-‘मी अजून…’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला (Narendra Modi Government) नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. यावर विरोधकांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मोदींच्या 9 वर्षाच्या कारकीर्दीला 9 पैकी किती मार्क देणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मी अजून शिक्षकी पेशा स्वीकारलेला नाही, त्यामुळं मला मार्क देता येणार नाही. पण प्रश्न सुटले का हे स्वत:च्या मनाला विचारा आणि आत्मचिंतन करा, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

महाराष्ट्र सदनातील (Maharashtra Sadan) अहिल्यादेवी होळकर (Ahilya Devi Holkar) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा अर्धपुतळा हटविण्यात आला होता. यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका केली. ते म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं सरकार आल्यापासून राज्यापाल, सरकारमधील मंत्री या सर्वांनी महापुरुषांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. त्या विरोधात आम्ही आंदोलन करित सरकारला जाब विचारण्याचं काम केले.

मात्र काल दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्या कार्यक्रमादरम्यान अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आले. ते पुतळे हटवण्याचे कोणतेही कारण नव्हते. या अशा घटना घडता कामा नये. मला एक प्रश्न पडतोय की, या घटना जाणीवपुर्वक केल्या जात आहेत का? नजर चुकीने घडले का? त्यामुळे मी त्या घटनेचा निषेध करतो आणि राज्यातील जनता या घटनेची निश्चित नोंद घेतली, अशा शब्दात अजित पवारांनी राज्य सरकारवर टाका केली.

कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून केंद्र सरकारला सुनावले

भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांच्याविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून
आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Agitation) चिरडण्यात आले.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्या खेळाडू आहेत. त्या महिला खेळाडू कोणत्याही पक्षाच्या नाहीत.
त्या राजकारण करीत नाहीत. अनेक दिवसांपासून न्याय मिळावा यासाठी आंदोलन करीत आहेत.
या आंदोलनाची वरिष्ठ नेते किंवा क्रीडामंत्री नोंद घेतील आणि संसद भवनाच्या उद्घाटन
(New Parliament Building Inauguration) कार्यक्रमापूर्वी हा विषय मार्गी लावतील अशी शक्यता होती.
जर विषय ताणून घ्यायचा नसेल आणि सामोपचाराने मार्ग काढायचा असेल तर चर्चेतून मार्ग निघू शकतो.
हे अनेक घटनांमधून दिसून आले आहे, अशा शब्दात अजित पवारांनी केंद्र सरकारला सुनावलं.

Web Title :   Sambhajiraje Chhatrapati | sambhajiraje chhatrapati says gautami patil needs no protection

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)