Ajit Pawar | महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ?; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | मागील दोन वर्षात कोरोनाच्या (Coronavirus) महामारीमुळे माणसाच्या जीवनाची रीत बदलली. घातक विषाणूमुळे सध्या माणसाला मास्कचा वापर करावा लागत आहे. आता राज्यातील, देशातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली. रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरु आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) राज्यातील कोरोनावरील निर्बंध उठवण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet) बैठक सुरु आहे. महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

 

राज्यातील जनतेला यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त (Unrestricted) साजरा करता येणार का ? असा सवाल सध्या उपस्थित केला जातो आहे. अशातच यावर आज दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. त्याचबरोबर ”मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करुन यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील. तसेच, महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ? यावर देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच उद्यापासून नविन नियमावली जाहीर होण्याची शक्यता असल्याचं देखील अजित पवार म्हणाले.

 

दरम्यान, रात्रीपर्यंत गुढीपाडव्या संबंधातील नियमावली, विशेषत: शोभायात्रांना परवानगी मिळणार की, नाही ? हे स्पष्ट होईल. तसेच, यूपीएचं नेतृत्त्व शरद पवारांनी करावं यासंदर्भातील चर्चांवरही अजित पवारांनी वक्तव्य केलं आहे. “केंद्रीय स्तरावरच्या मुद्द्यावर शरद पवार, सोनिया गांधी आणि ठाकरे निर्णय घेतील”, असं अजित पवार यांनी त्यावेळी नमुद केलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar press conference will maharashtra be completely free from restrictions deputy chief minister ajit pawar important statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा