Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ आशयाचे स्टिकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हा धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक असा केला होता. त्यावरून विविध मराठा संघटना तसेच राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार आक्रमक झाले होते. अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली होती. त्यावर पत्रकार परिषद घेत अजित पवारांनी आपली भूमिका जाहीर केली होती. तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. असे देखील यादरम्यान जाहीर केले होते. त्यातच एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता राष्ट्रवादी पुणे शहरच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे ढोल ताशे वाजवत स्वागत केले. तसेच या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवार यांच्या हस्ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ अशा आशयाचे पोस्टर कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर लावण्यात आले.

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात यांचे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजितदादा पवार यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार देखील अर्पण केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही
फोटो शेअर करत औरंगजेब हा धर्मद्वेषटा नव्हता असे लिहिले होते.
त्यावर जितेंद्र आव्हाडांवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांवर अतिशय खोचक शब्दात टीका केली होती.
पण यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून औरंगजेबाच्या नावापुढे ‘जी’ वापरण्यात आल्यामुळे एका
नव्या वादाला तोंड फुटले होते. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार पलटवार केला.
त्यातच आता अजित पवारांनी थेट दुचाकींवर ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ अशा आशयाचे स्टिकर
लावल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar put stickers on bikes in pune with slogan swarajya rakshak chhatrapati sambhaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | नाशिक पाठोपाठ ठाकरे गटाला परभणीत मोठा धक्का! एवढ्या नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश

Girish Mahajan | ‘त्या’ विधानाबाबत गिरीश महाजन यांनी मागितली माफी, म्हणाले- ‘तो उल्लेख अनावधानाने झाला’