Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ? अजित पवारांचा खोचक सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा रोखठोक स्वभाव महाराष्ट्राने मागील काही वर्षात पाहिला आहे. त्यांच्या हटके स्टाईल भाषणाची नेहमीच चर्चा होत असते. आजही अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हटके स्टाईल भाषणाची प्रचिती आली. काल पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने अटक (Arrest) केली. या कारवाईबाबत अजित पवारांना विचारण्यात आले असता, अविनाश भोसलेबद्दल मला काय माहिती, आता सीबीआयला (CBI) विचारायला जाऊ का? असा खोचक सवाल अजित पवारांनी केला.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आज दगडूशेट गणपतीचे (Dagadushet Ganapati) बाहेरून दर्शन घेतले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, संविधानाने (Constitution) अधिकार दिला आहे कुठंही जाण्याचा, परंतु कोणी सांगतं कोणी सांगत नाही, तसं बाहेरुनच काहीजण दर्शन घेतात. नाही गेलं तर नास्तिक आहे म्हणतात आणि गेलं तरी अडचण, मात्र बाहेरुन नमस्कार करायला काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला.

 

पवारांवर आरोप होणे दुर्दैवी

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पवार साहेबांनी महाविकास आघाडीशी (Mahavikas Aghadi) चर्चा करुन निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. राष्ट्रवादीने आपली मतं शिवसेनेला (Shivsena) देण्याचे ठरवलं होतं संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात काय बोलणं झालं हे माहित नाही. परंतु ही जागा देण्याबाबतचा अधिकार सेनेचा होता. या प्रकरणात पवारांवर आरोप होणे दुर्दैवी असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. मात्र कोणत्याही कारणासाठी पवार साहेबांचं नाव घेणं ही आता फॅशन झाली आहे, असेही अजित पवार म्हणाले.

 

शाहरुख खानची फॅमिली डिस्टर्ब झाली

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) क्लीन चिट मिळाली.
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, आपणच बघा तरुण मुलाचं वय किती, त्याचे दिवस वाया गेले.
त्यांची फॅमिली डिस्टर्ब झाली, शाहरुख खाननं शुटींग सोडून दिलं होतं. ज्या काही यंत्रणा आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे.
त्यातून निष्पाप लोकांना अडकवलं जाऊ नये अशी सामान्य माणसाची भावना असल्याचे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar question what do i know about
avinash bhosale arrest what to ask cbi now

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा