Ajit Pawar | निलेश राणेंची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका, अजित पवार म्हणाले-‘गलिच्छ पद्धतीने बोलण्याचं काम…’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते (BJP Leader) आणि माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. यावरुन राणेंना राष्टवादीच्या नेत्याकडून लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच राणेंच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना राजकीय पक्षांना सल्ला दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

 

काय म्हणाले निलेश राणे?

मुस्लीम (Muslim) आणि ख्रिश्चन समाजाविषयी (Christian Community) शरद पवारांनी विधान केले होतं. देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार म्हणाले होते. यावर टीका करताना निलेश राणेंनी खोचक ट्विट केलं होतं. निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा (Aurangzeb) पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार, असं म्हणत शरद पवारांची तुलना औरंगजेब बरोबर केली होती.

 

 

इतके गलिच्छ पद्धतीने बोलण्याचं काम…

याबाद्दल अजित पवारांना (Ajit Pawar) विचारलं असता ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळलं. तेव्हापासून अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्रीपद सांभाळल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु, इतके गलिच्छ पद्धतीने बोलण्याचे काम काही राजकीय पक्षाचे लोक करत आहेत. त्यांना बोलता येतं इतरांना बोलता येत नाही का? त्यांनाच सगळ समजतं आणि इतरांना समजत नाही, असं अजित पवार म्हणाले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, वास्तवीक या सगळ्या बद्दल ज्यांच्या ज्यांच्या राजकीय पक्षाचे लोक हे बोलत असतील.
त्यांना त्यांच्या वरिष्ठ लोकांनी सांगितलं पाहिजे असं कुणीच कुणाबद्दल बोलू नये. वैचारिक मतभेद दाखवा याबद्दल कोणाचंच काही म्हणणं नाही.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेते, प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची गरज नाही.
असेच होत राहिलं, तर महाराष्ट्राला बदनाम करण्याची गोष्ट आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

 

 

 

Web Title :  Ajit Pawar | ajit pawar react on nilesh rane compare sharad pawar aurangzeb

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा