Ajit Pawar | ‘मिठाचा खडा कुणी टाकण्याचा…’, मविआतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टच बोलले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) एक वर्ष बाकी असताना राज्यातील प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अद्याप जागावाटप झालेले नाही. मात्र मित्र पक्षांकडून एकमेकांच्या जागावर दावा केला जात आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे (NCP OBC Cell) दोन दिवसांचे शिबीर नागपूर येथे होत आहे. याचे उद्घाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत ज्या घडामोडी घडल्या आहेत. यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, जर कुणी काही बोलले तरी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु असते. तिघांनी पुढं मागे व्हावे लागेल. एकत्र लढलो तरच भाजपचा (BJP) विरोधात लढू शकतो. मिठाचा खडा कुणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाही. प्रवक्ते बोलले तरी वरिष्ठ नेते एकत्रितपणे चर्चा करतात, त्यांच्यात काहीही वाद नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

पुणे लोकसभा पोट निवडणुकीबाबत (Pune Lok Sabha Bypoll Election) केलेल्या वक्तव्यावर स्पष्टिकरण देताना अजित पवार म्हणाले, पुणे लोकसभा निवडणुकीसंदर्भात मी एवढंच बोललो की ज्याची ताकद जास्त आहे त्याला झुकतं माप दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर जास्त जागा आहेत ते बघून जागा वाटप करावं असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी आपल्या वक्तव्यावर दिलं.

 

रेल्वे अपघाताची चौकशी व्हावी

शुक्रवारी रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) 300 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.
यात यापूर्वी अशा प्रकरारचे अपघात झाल्यावर राजीनामे दिले होते. त्यामुळे आत्ताच्या रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
राजीनामा (Resignation) देऊन प्रश्न सुटणार नाही. मात्र खालच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होईल.
आज वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Railway) सुरु केली जात आहे. प्रणाली अद्यावत होत असताना अशा प्रकारे
सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला. त्यामुळे चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

 

 

Web Title :  Ajit Pawar | ajit pawar reaction on mahavikas aghadi loksabha 2024 seat allocation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा