Ajit Pawar | महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे वळवून राज्याला आर्थिक मागास करण्याचा डाव- अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील तळेगाव (Talegaon) येथे प्रस्तावित असलेल्या वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta Foxconn Project) गुजरातमध्ये जाणार असल्याचे समजताच राज्यातील विरोधी पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी याप्रकरणी मंगळवारी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणला जावा, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेसबुक पोस्ट करत या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार (Employment) उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर (Semiconductor) व डिस्प्ले फॅब्रीकेशन प्रकल्प (Display Fabrication Projects) गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला (Industrial Progress) बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं (State Government) यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

वेदांता ग्रुपच्या (Vedanta Group) वतीने या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम (Ecosystem), ऑटोमोबाईल (Automobile) व इलेक्ट्रीक हब (Electric Hub), रस्ते (Road), रेल्वे (Rail) व एअर कनेक्टीव्हिटी (Air Connectivity), ‘जेएनपीटी’ बंदराशी (JNPT Port) असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे (Maharashtra State) गुंतवणूक धोरण (Investment Policy) हे पोषक असल्यानं वेदांता ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये (Gujarat) नेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे.

 

 

महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे.
यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे (GST) सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला
असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांताचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) करणार आहेत, असं कळतंय.
महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar reaction on vedanta foxconn semiconductor manufacturing plant shifting from maharashtra to gujrat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | 30 हजार रुपये लाच घेताना पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Maharashtra Rains | शनिवारपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस; नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार

 

Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीची सरकारवर टीका, फडणवीस रशिया दौऱ्यावर, अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला