मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajit Tambe) यांनी शनिवार (दि.४ फेब्रुवारी) रोजी पत्रकार परिषद घेत काँग्रेस (Congress) पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर गंभीर आरोप केले. आम्हाला पक्षाकडून चूकीचा एबी फॉर्म देण्यात आला, आमच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी हा कट रचण्यात आला. असे आरोप यावेळी बोलताना सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर केले आहेत. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर बारामती येथील सभेत बोलताना एक वक्तव्य केले आहे. त्याची आता चांगलीच चर्चा होत आहे.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, ‘शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातील शिक्षकांनी कोणाला निवडून दिले हे आपण पाहिलेच आहे. सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा सध्याच्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. फोडाफोडीचं राकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. मात्र सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले.’ असे यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.
तर पुढे बोलताना त्यांनी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीबद्दल एक विधान केले त्याची चांगलीच चर्चा होत आहे. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘आमची जरा चूक झाली. मी त्याचा अगोदर उल्लेख केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. वडील काय किंवा मुलगा काय. तरूणांना संधी दिली पाहिजे. तरूण चांगले काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे. मात्र यात कोणाला उमेदवारी द्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा अधिकार होता. त्यात लुडबूड करण्याचे मी काही कारण नव्हते. कारण ती जागा काँग्रेस पक्षाला सुटली होती.’ असे म्हणत अजित पवार यांनी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीबाबत मत व्यक्त केले.
दरम्यान, काल पत्रकार परिषदेत बोलताना सत्यजीत तांबे यांनी भाजपमध्ये (BJP) पक्षप्रवेशाबाबत होत असलेल्या
चर्चांना पूर्णविराम दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी अपक्ष आहे, आणि अपक्षच राहणार. असे मत त्यांनी व्यक्त केले.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar sai made mistake by not giving ticket to
satyajeet tambe for nashik graduate constituency election
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Pimpri Chinchwad Crime | बनावट सोने तारण ठेवून 27 लाखाचे कर्ज घेणाऱ्या दोघांना अटक, निगडी परिसरातील घटना
- Lions Veterans Cup” T-20 Cricket | गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक्नॉलॉजी सलग दुसरा विजय;
लवासा रॉयल्स्, रॉयल पासलकर संघांची विजयी सलामी - Ghoda Marathi Movie | वेगवेगळ्या महोत्सवांत गौरवलेला ‘घोडा’ सिनेमा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला