Ajit Pawar | ‘सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (District Central Co-operative Banks) संदर्भात केंद्र सरकारने बरेच बदल केले असल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. याच्याविरोधात आम्ही कोर्टात (court) जाणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यावेळी ते बारामतीत (Baramati) एका कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती शहर आणि तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची तसेच प्रकल्पांची माहिती दिली. यादरम्यान मेडद येथे नव्याने बाजार समितीच्या पेट्रोल पंप होत आहे. हा पेट्रोल पंप खरेदी विक्री संघाकडे चालवण्यासाठी देण्यात आला आहे. या पेट्रोल पंपाच्या कामाचे काय झाले, काम कुठपर्यंत आले, याबाबतही तेव्हा विचारणा अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, त्यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही उत्तम प्रकारे चालवली आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या 5 बँकामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश होतो.
मात्र सहकारी बँकांमधील अर्थव्यवस्थाच स्वत:च्या ताब्यात यावी, असा केंद्राचा प्रयत्न सुरू आहे.
यात वकिलांमार्फत कायदेशीर सल्ला घेऊन सहकार विभागाच्यावतीने पुढे न्यायालयात कशा पद्धतीने जाता येईल.
याबाबत राज्य सरकारची सल्लामसलत सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Web Titel :- Ajit Pawar | ajit pawar said go court against centre govt interference co operative banks

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Political News | भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक – अजित पवार

Pune News | मुस्लिम बांधवांच्या वतीने मानाच्या गणपतींच्या महाआरतीचे आयोजन; कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले – ‘पुण्यातील गणेशोत्सव हा सामाजिक सलोख्याचा आदर्श’

Satara Crime | पतीला निलंबित केल्याने पत्नीने घातला थेट ‘CEO’ च्या दालनात ‘राडा’