Ajit Pawar | पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार का?, अजित पवार म्हणाले- ‘ बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक …’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) दिवंगत नेते खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Babat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll Election) होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) पोटनिवडणुकीची तयारी सुरु केल्यामुळे पुण्याची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. या निवडणुकी संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाकीत केलं आहे. पुणे टिंबर मार्केट (Pane Timber Market Fire) येथे लागलेल्या आगीच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टिंबर मार्केट अग्नितांडव घातपात असेल तर चौकशी व्हावी अशी मागणी केली.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला असं वाटत होतं की पुण्याची पोटनिवडणूक लागणार नाही. पण, आता बहुतेक पुण्याची पोटनिवडणूक लागणार आहे. मला वाटत होतं की एक वर्ष लोकसभा निवडणुकीला राहिले आहेत. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण आता निवडणूक लागू शकते.

अजित पवार पुढे म्हणाले, आज इतर पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादीची (NCP) ताकद जास्त आहे. रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांनी मदत केली. जिथ निवडणूक लागेल तिथे ज्यांची ताकद जास्त आहे, त्यांना उमेदवारी मिळावी, असंही अजित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, पुणे जिल्हा निवडणूक विभागाकडून (Pune District Election Department) पोटनिवडणुकीची
तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा निवडणूक आयोगाने (District Election Commission) 17 दिवसांपूर्वी
तयारीला सुरुवात केली आहे. मतदार याद्या अद्यावत करणे, मतदान केंद्राचे स्थान निश्चित करण्याची कामे
पूर्ण झाली आहेत. कर्नाटक निवडणुकीचा निकाल (Karnataka Election Result) लागल्यानंतर 4220
ईव्हीएम मशीन (EVM Machine) आणि 5070 व्हीव्हीपॅट मशीन (VVPAT Machine) बंगळुरुहून पुण्यात
पाठवण्यात आल्या आहेत. या मशिन्सची सेटिंग आणि चेकिंग करण्यासाठी 30 इंजिनियर्सची नियुक्ती करण्यात
आली होती. बुधवारी (दि.24) या मशिन्सच्या सेटिंग आणि चेकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
या मशिनवर पुणे बाय इलेक्शन असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

Web Title : Ajit Pawar | Ajit pawar said that pune lok sabha by election will be held

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Assistant Police Inspector (API) Death Due To Heart Attack | दुर्देवी ! मुलाच्या लग्नासाठी हक्क रजेवर असताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास हार्टअटॅकने मृत्यू

Pune News | हौशी बैलगाडा मालकाने घोडीला आणले महागड्या फॉर्च्युनर कारमधून; व्हिडीओ तुफान व्हायरल

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून पोलीस हवालदाराचा महिलेवर बलात्कार, बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप