Ajit Pawar | ‘…तर मी राजकारण सोडेन’, शिंदे गटाच्या खासदाराच्या आरोपांवर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री (Former Finance Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार कृपाल तुमाने (MP Kripal Tumane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आरोप सिद्ध केला तर मी राजकारण सोडेन असं सणसणीत उत्तर अजित पवारांनी (Ajit Pawar) तुमाने यांना दिले आहे. तसेच जर आरोप सिद्ध झाले नाही तर तुमाने यांनी घरी बसावं असा टोला त्यांनी लगावला.
नागपुरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) यांनी ते अर्थमंत्री असताना किती खोके जमवले ते सांगावं. खोक्याशिवाय अजित पवार काम करत नव्हते. झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक खोक्यांवरच बोलतात, पैसे घेतल्याशिवाय दादा कामच करत नव्हते, असा गंभीर आरोप कृपाल तुमाने यांनी केला होता.
कृपाल तुमाने यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले.
तुमाने यांनी सांगावं किंवा महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने जरी सांगितले तरी मी राजकारण सोडेन.
यांनी सिद्ध करुन दाखवावं. सिद्ध करुन दाखवलं नाही तर खासदाराने उद्यापासून घरी बसावं.
पण हा असला आरोप माझ्यावर करायचा नाही. महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना विचारा माझ्या कामाची पद्धत
काय होती ते. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला.
राज्य सरकारच्या विरोधात लोकांमध्ये असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना (Shivsena)
धडा शिकवले. मात्र, पन्नास खोके एकदम ओके हे तुम्हालाही विसरायचे नाही, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे
गटातील नेत्यांवर निशाणा साधला होता. यावर प्रत्युत्तर देताना खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवारांवर
गंभीर आरोप केला होता.
Web Title : Ajit Pawar | ajit pawar says i will quit politics if krupal tumane proves his allegations
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी वारीत ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यास बंदी