Ajit Pawar | मविआच्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपचं सूत्र ठरलं?, अजित पवारांनी मांडले सत्तेसाठीचं गणित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली. कर्नाटक निकालानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी तातडीने सर्वांना बोलावलं होतं असं अजित पवार यांनी सांगितलं. याआधीच संजय राऊत (Sanjay Raut) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी माहिती दिल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थिर असल्याचं म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकांची (Mid-Term Elections) शक्यता अजित पवार यांनी फेटाळत सत्तेसाठीचं गणितच मांडलं. त्यामुळे सरकार पडणार नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार पुढे म्हणाले, 2014 सालापासून काही राज्यांचा अपवाद वगळता मोदी यांचं सरकार आलं. यामुळे भाजपमध्ये (BJP) जोश आणि उत्साह पाहायला मिळायचा. कर्नाटकचा निकाल लागला आणि एक्झिट पोलचा पण निकाल फेल ठरला. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळाला.

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर पुढची प्लॅनिंग कशी असली पाहिजे? तसेच वज्रमूठ सभेबद्दल (Vajramuth Sabha) चर्चा झाली. आगामी निवडणूकीसाठी मविआ म्हणून 48 जागांचं वाटप करावे अशी चर्चा झाली. पुन्हा निवडणुका लागल्यावर घाई नको. जागा वाटप झाल्यावर काही नावं तिन्ही पक्ष देतील आणि सहा लोकं बसून जागा कश्या वाटप करायच्या यावर चर्चा करतील. केवळ मविआ नाही तर जे आमचे समर्थक पक्ष आहेत त्यांचाही समावेश आम्ही करुन घेऊन, असंही अजित पवार म्हणाल.

मध्यावधी निवडणुकांबबात बोलताना अजित पवार म्हणाले, मध्यावधी निवडणुकांची चर्चा माझ्याही कानावर
आली आहे. मात्र 16 आमदारांबाबत सध्या वेगळा काही निर्णय होईल असं वाटत नाही.
जरी वेगळा निर्णय झाला, हे 16 आमदार अपात्र ठरले तरी उर्वरीत 272 आमदारांकडून बहुमताचा आकडा
सध्याच्या सरकारकडे आहे. भाजप-शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आणि अपक्ष मिळून 165
चं संख्याबळ सरकारकडे आहे. आमदार अपात्र झाले तरी सरकारकडे बहुमताचा आकडा असल्याचे गणित अजित पवारांनी मांडले.

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्या कर्यकर्त्याला
मीच तयार केलं होतं. स्थानिकांशी त्याचं काही जमत नव्हतं. त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
त्यांना समाजात मान, सन्मान आहे. माझ्या परीने मी शक्ती, ताकद द्यायचा प्रयत्न केला.
मात्र, दुर्दैवाने आम्ही काही करु शकलो नाही. मध्यंतरी आयकर विभागाची (Income Tax Department) धाड
पडली होती, असेही अजित पवार यांनी नमूद केलं.

Web Title :-  Ajit Pawar | ajit pawar says mva meeting over loksabha 2024 planning and other issue

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | राज्यात दंगली घडवणाऱ्यांना अद्दल घडवणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Sameer Wankhede | ‘आर्यन खान प्रकरणात 25 कोटी उकळण्याचा डाव’, सीबीआयचा FIR मध्ये मोठा खुलासा